Shivtej Din 2023 Wishes: शिवतेज दिनानिमित्त WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा शेअर करत द्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही शिवतेज दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Shivtej Din 2023 Wishes (PC- File Image)

Shivtej Din 2023 Wishes: छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लालमहालामध्ये शेकडो वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. लालमहालात झालेले हे युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो. चैत्र शुद्ध अष्टमीला ही घटना घडली होती. त्यामुळे या दिवशी शिवतेज दिन साजरा केला जातो. यंदा 29 मार्चला शिवतेज दिन साजरा केला जाणार आहे.

शिवतेज दिनाच्या निमित्ताने WhatsApp Status, Quotes, Messages, SMS द्वारा शेअर करत आपल्या मित्र-परिवारास खास मराठमोळ्या शुभेच्छा द्या. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही शिवतेज दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

जगणारे ते मावळे होते

जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्व:च्या कुटुंबाला विसरून

जनतेकडे मायेने हात फिरवणारा.

तो आपला 'शिवबा' होता

जय शिवराय

Shivtej Din 2023 Wishes (PC- File Image)

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

Shivtej Din 2023 Wishes (PC- File Image)

राजे असंख्य झाले आजवर या जगती,

पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..

गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला.

शिवतेज दिनाच्या शुभेच्छा

Shivtej Din 2023 Wishes (PC- File Image)

शिवतेज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Shivtej Din 2023 Wishes (PC- File Image)

 

पुण्यातील लालमहालात शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता. शाहिस्तेखानाने चाकण, सासवड, इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हल्ला केला. यावेळी शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान पुण्यातील लालमहालात येईपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहचले. यावेळी त्यांना शाहिस्तेखानाच्या त्रासाची कल्पना आली. त्यानंतर महाराजांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली आणि त्याला पुणे सोडण्यास भाग पाडले.