Rajmata Jijau Punyatithi 2025 Quotes In Marathi: जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त Messages, WhatsApp Status द्वारे करा राजमातेला अभिवादन!
जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही खालील ग्रीटिंग्ज द्वारे राजमातेच्या स्मृतीस अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Rajmata Jijau Punyatithi 2025 Quotes In Marathi: यंदा 20 जून रोजी राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार येणारी पुण्यतिथी (Rajmata Jijau Punyatithi 2025) साजरी करण्यात येणार आहे. मराठ्यांच्या इतिहारात राजमाता जिजाऊ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले. जिजाबाई लहानपणापासूनचं शिवरायांना धार्मिक गोष्टी सांगत असे. त्यांच्या मनात राम राज्याची कल्पना होती. मुघलांचे राज्य नष्ट करून शिवबाने रामराज्य उभं करावं अशी त्यांची इच्छा होती.
स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी जिजाऊंची ही इच्छा पूर्ण केली. जिजाऊ या प्रचंड धार्मिक होत्या. जिजाबाई शिवाजी महाराजांसोबत पुण्यात राहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली आणि तांबडी जोगेश्वरी आणि केवरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. जिजाऊंचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही खालील ग्रीटिंग्ज द्वारे राजमातेच्या स्मृतीस अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.





जिजाऊंना तिला भवानी आणि महादेव यांचा आशीर्वाद असल्याचा दृढ विश्वास होता. जेव्हा शहाजी राजे किंवा शिवबा संकटात सापडायचा तेव्हा ती रात्रंदिवस त्यांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षित परतीसाठी भवानीमातेला कळकळीने प्रार्थना करायची. जिजाबाईंनी त्यांच्या आयुष्यात मुलगी, बहीण, पत्नी, सून, वहिनी, आई, सासू, आजी अशा सर्व भूमिका उत्तमरित्या बजावल्या.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2025 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

