No Bra Day 2020: अभिनेत्री Jennifer Aniston, Kim Kardashian ते Saba Qamar या स्टार्सनी दिलाय बेधडक 'नो ब्रा' लूक!
आजही अभिनेत्रींचे अशा प्रकारे समोर येणारे ब्रा फ्री लूक किंवा धाडसाने निपल्स जगासमोर दाखवणं याला wardrobe malfunction म्हणून दाखवलं जातं किंवा संबोधलं जातं.
जगभरात 13 ऑक्टोबर हा दिवस No Bra Day म्हणून साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या परफेक्ट फिगर बद्दल नेहमीच अनेक प्रश्न असतात. याच न्यूनगंडातून काही निर्णय त्यांच्या आरोग्याला धोकादायकही ठरतात. अशापैकीच एक म्हणजे ब्रा. दिवसभराच्या ताण तणावानंतर ब्रा काढणं हे अनेकींसाठी रिलॅक्सिंग फिलिंग असतं. देशा-परदेशामध्ये काही अभिनेत्रींनी समाजाच्या बोलण्याकडे, त्यांच्या स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टीकोनाला वार्यावर सोडत 'ब्रा' न घालता कॅमेर्याला सामोरं जाण्याचं धारिष्ट्य दाखवलं आहे. 13 ऑक्टोबरचा No Bra Day हा त्याच संकल्पनेसाठी आहे. ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती माहिना म्हणून पाळला जातो. एक दिवस ब्राचा वापर टाळत तुमच्या स्तनांना मोकळं ठेवत स्वातंत्र्य अनुभवण्याचा दिवस आहे. चूकीच्या ब्रा किंवा त्याचा अतिवापर यामुळे महिलांचं आरोग्य धोक्यात आले आहे. मग ब्रा शिवाय लोकांसमोर बेधडक उभ्या राहणार्या या अभिनेत्रींचा No Bra लूक देखील पहा.
Jennifer Aniston
लोकप्रिय अमेरिकन सिटकॉम फ्रेन्ड्स मधील रेचल म्हणजेच अभिनेत्री Jennifer Aniston ने केवळ आता नव्हे तर फ्रेंड्स मालिकेतही नो ब्रा लूक मध्ये कॅमेर्याला सामोरी गेली आहे. काही सिन्समध्ये तिने फ्री निपल्स मध्ये सहज वावरत बोल्ड स्टेप्स घेतल्या आहेत. नुकतच Elle मासिकासाठी फोटोशूट देखील तिने ब्रा लेस केले आहे. यामध्ये तिने केवळ पांढरा टॅन्क टॉप घातला होता.
Saba Qamar
Saba Qamar ही अभिनेत्री देखील हातामध्ये सिगार आणि ब्रा लेस व्हाईट टॉप मध्ये सहज वावरताना कॅमेर्यामध्ये टिपली गेली आहे. तिच्या या लूकमुळे चाहते नाराजदेखील झाले होते मात्र तिला ट्रोलर्सना गप्प करण्याची हातोटी आता अवगत आहे.
Kim Kardashian
View this post on Instagram
@kimkardashian went braless while grabbing lunch in LA! #KimKardashian Photos: Backgrid
A post shared by Just Jared (@justjared) on
किम कर्दाशियन अनेकदा ब्रा लेस बोल्ड अंदाजामध्ये लोकांसमोर वावरली आहे.
Amber Heard
अभिनेत्री Amber Heard ने देखील खुलेपणाने आपला ब्रा फ्री लूक दाखवला आहे. सोशल मीडियात त्याची तिला किंमतही मोजावी लागली आहे.
आजही अभिनेत्रींचे अशा प्रकारे समोर येणारे ब्रा फ्री लूक किंवा धाडसाने निपल्स जगासमोर दाखवणं याला wardrobe malfunction म्हणून दाखवलं जातं किंवा संबोधलं जातं. पण स्त्री शरीराचा एक अभाग म्हणून तिला तो तिच्या सोयीनुसार ड्रेसमध्ये फ्लॉन्ट करता यावा यासाठी विचार बदलणं गरजेचे आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)