'नववर्ष दिन' गूगल डुडलच्या माध्यमातून Google ने दिल्या 2020 च्या पहिल्या दिवसाच्या खास शुभेच्छा!
केवळ पाश्चिमात्य देश नव्हे तर भारतामध्ये त्याचा मोठा उत्साह असतो. गूगलने त्याच्या होमपेजवर खास अंदाजात 'नववर्ष दिन' शुभेच्छा दिल्या आहेत.
New Year's Day Google Doodle: 2020 या नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. इंटरनेट जगतातील अग्रगण्य सर्च इंजिन 'गूगल'ने देखील आज या नव्यावर्षाच्या शुभेच्या एका हटके डूडलच्या माध्यमातून दिल्या आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येप्रमाणेच 'नववर्ष दिन' New Year's Day) गूगल डुडल मध्येही कार्टुन स्वरूपातील बेडुक (Froggy-The Weather Frog) आहे. तो नव्या वर्षाचा पहिला सुर्यादय पाहत असल्याचं सुंदर गुगल डुडल आज जगभर गूगलच्या होमपेजवर दिसत आहे. दरम्यान 2020 हे लीप इयर असल्याने दर चार वर्षांनी येणार्या या खास वर्षाची जगभरातील लोकांना उत्सुकता आहे. हे नवं वर्ष म्हणजे 21 व्या शतकातील तिसर्या दशकाची नांदी आहे. आगामी या नव्या वर्षासोबत आता एक नवं दशक सुरू होत आहे. त्यामुळे जगभरातून नव्या वर्षासोबतच नव्या दशकाच्यादेखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. Happy New Year 2020 Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून स्वागत करा 21 व्या शतकातील तिसर्या दशकाचं.
नवं वर्ष, नवा दिवस ही आयुष्यात राहुन गेलेल्या गोष्टींची नवी सुरूवात करण्याची अजून एक संधी असते. त्यामुळे आता या नव्या वर्षात देखील मागे राहून गेलेल्या काही गोष्टी नव्याने सुरू करण्यासाठी, आगामी वर्षासाठी तुमच्या मित्र मैत्रिणींसह, प्रियजनांना शुभेच्छा द्या. Happy New Year 2020 Messages: नववर्षाच्या शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांना द्या आगामी नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2020 या नववर्षाची सुरूवात होणार आहे. या कॅलेंडरनुसार 1 जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. भारताप्र्माणे जगभरात लोकं त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात. मग यंदा तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या आयुष्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी ही काही शुभेच्छापत्र, मेसेजेस तुम्हांला नक्कीच मदत करतील.
गूगल जगभरात महत्त्वाच्या दिवशी, राजकारण, कला, समाजकारण या क्षेत्रात मोलाचं योगदान देणार्या व्यक्तीच्या स्मृतिदिनी खास गुगल डूडल बनवून शुभेच्छा देते. त्यामुळे या नवं वर्षाच्या पहिल्या दिनी आता सार्या कटू आठवणी मागे सारून नव्याने सुरूवात करा. लेटेस्टली कडूनही तुम्हंला नव्या वर्षाच्या खास शुभेच्छा!