Navratri 2026 Wishes In Marathi: शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत करा नवरात्रोत्सवाची सुरुवात

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून, रविवार ११ ऑक्टोबर २०२६ रोजी, घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नऊ रात्री चालणाऱ्या आदिशक्तीच्या उपासनेचे महत्त्व, घटस्थापनेचा मुहूर्त आणि नऊ दिवसांचे वेळापत्रक जाणून घ्या.

आश्विन शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी,  घटस्थापनेने यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiya Navratri Utsav) सुरुवात होत आहे. नऊ रात्री आणि दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. उत्सवाचा समारोप मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने होईल. नक्की वाचा: Ghatasthapana 2026 Muhurat: शारदीय नवरात्रीमध्ये यंदा घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त काय? घ्या जाणून . 

धार्मिक मान्यतेनुसार, महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध करून देवी दुर्गेने दहाव्या दिवशी त्याचा वध केला. त्यामुळे नवरात्र हा असत्यावर सत्याचा आणि अहंकारावर शक्तीचा विजय मानला जातो. विजयादशमीला हा विजयोत्सव साजरा होतो. मग अशा या मंगलमय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा शेअर करत नवरात्र आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना देत या सणाचा आनंद द्विगुणित करा.

घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा

Happy Navratri 2026
आई अंबेची कृपा राहो सदैव तुमच्यावर,
सुख-शांती नांदो तुमच्या घरावर।
आनंदाने भरून जावो प्रत्येक दिवस खास,
नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Navratri 2026
मातेचा आशीर्वाद लाभो,
घरात सुख-समृद्धी नांदो।
प्रत्येक मनात आनंद राहो,
नवरात्री आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा!
Happy Navratri 2026
नवदुर्गांच्या कृपेने सुख मिळो,
प्रत्येक स्वप्न तुमचे पूर्ण होवो।
आनंद आणि प्रेम घरात राहो,
नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Navratri 2026
मातेच्या नावाने दिवस सुरू होवो,
घरात नेहमी आनंद राहो।
सुख-समृद्धीने संसार फुलो,
नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Navratri 2026
आई भवानीची कृपा राहो,
संकटांपासून नेहमी दूर ठेवो।
जीवनात सुख-शांती भरभरून येवो,
नवरात्री आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा!

नवरात्र हा केवळ पूजेचा काळ नाही, तर शक्तीच्या उपासनेचा काळही मानला जातो. नऊ दिवसांचा उपवास, ध्यान, नामजप आणि सात्त्विक आहार यांमुळे मन आणि शरीर शुद्ध होते, अशी श्रद्धा आहे. शरद ऋतूच्या सुरुवातीला येणाऱ्या या उत्सवाचा शेतीशी असलेला संबंधही अधोरेखित केला जातो.  नक्की वाचा: Navratri Colours 2026 List In Marathi: शारदीय नवरात्रीतील यंदाचे नऊ रात्रीतील नऊ रंग कोणते? 

महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई), तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी यांचा समावेश होतो. या सर्व ठिकाणी नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. घरोघरी घटस्थापना, देवीचा जागर, भोंडला आणि गरबा-दांडियाचे कार्यक्रमही होतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement