Navratri 2022 Rangoli Designs: नवरात्री उत्सवासाठी रांगोळीच्या हटके आणि आकर्षक डिझाईन व्हिडीओ, पाहा ट्यूटोरियल व्हिडिओ

दरम्यान, आम्ही नवरात्रीसाठी काही आकर्षक रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

Representative Image (Photo Credits: YouTube)

Navratri 2022 Rangoli Designs: हिंदू कॅलेंडरमधील अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणतात. शारदीय नवरात्री हा सर्वात महत्वाचा नवरात्रोत्सव आहे. नवरात्री  26 सप्टेंबर, सोमवारपासून सुरू होईल आणि 5 ऑक्टोबरला सांगता होईल, 5 तारखेला विजयादशमी साजरी केली जाईल. दरम्यान, 26 सप्टेंबर  ते 5 ऑक्टोबर दरम्यान दुर्गापूजा केली जाते आणि देवींच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.  असे मानले जाते की, नवरात्रोत्सवात देवी भक्तांना वेगवेगळ्या रूपात आशीर्वाद देते. दरम्यान, हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी घर स्वच्छ केले जाते, आकर्षक सजावट केली जाते आणि घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. दरम्यान, तुमचे घर रांगोळीने सुशोभित करा. [हे देखील वाचा: Ghatasthapana 2022 Puja Vidhi: घटस्थापना कशी करावी? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त, जाणून घ्या]

नवरात्रीसाठी रांगोळीच्या सुंदर डिझाईनचे ट्यूटोरियल व्हिडिओ घेऊन आलो आहोत. नऊ दिवसांच्या उत्सवासाठी नऊ वेगळ्या डिझाईन तुम्ही काढू शकता. देशातील विविध प्रांतांमध्ये नवरात्री वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. काही लोक शारदीय नवरात्रीच्या वेळी उपवास करतात आणि धार्मिक उत्सवात भाग घेतात, तर काही लोक दांडियाचा आनंद घेतात.  म्हणूनच, माँ दुर्गा भक्तांना जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आशीर्वाद देण्यासाठी ओळखली जाते. तुम्ही शारदीय नवरात्री साजरी करत असताना, तुमचे घर सुंदर सजवण्यासाठी सोपे रांगोळीचे नमुने घेऊन आलो आहोत. नवरात्रोत्सवासाठी देवीच्या चेहऱ्याचा मुखवटा पॅटर्न आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स कसे काढायचे हे शिकण्यासाठी व्हिडिओ पहा.[ हे देखील वाचा: Durga Puja 2022: दुर्गा पूजा उत्सव, इतिहास, महत्त्व आणि प्रथा; घ्या जाणून]

पाहा व्हिडीओ:  

नवरात्री 2022 साठी रांगोळी डिझाइन्स

नवरात्री 2022 साठी रांगोळी डिझाइन्स

नवरात्री 2022 साठी हटके रांगोळी डिझाइन्स

नवरात्री 2022 साठी आकर्षक रांगोळी डिझाइन्स

नवरात्रीच्या शुभेच्छा! पुढील आनंदी आयुष्यासाठी दुर्गादेवीला प्रार्थना करून सुंदर सण साजरा करा. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी डिझाइन काढून आपल्या पारंपारिक प्रसंगी आणखी उत्साह वाढवा. ट्यूटोरियल व्हिडिओंमधून प्रेरणा घ्या आणि सुंदर डिझाईन काढा.