Navratri 2022: नवरात्र उत्सवाची आज पहिली माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप
आजचा दिवस शैलपुत्री देवीला समर्पित आहे.
आजपासून शारदेय नवरात्राला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. आज घटस्थापना (Ghatasthapana) म्हणजे नवरात्राचा (Navratri) पहिला दिवस. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या (Durga Mata) नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या जाते. आज नवरात्राची पहिली माळ असून नवदुर्गेचे प्रथम स्वरुप शैलपुत्री देवीला (Shailaputri Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग पांढरा (White) आहे. पुढील नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची भक्ती भावाने पूजा केल्या जाते. काही भाविक आपल्या घरी घटची स्थापना करत दुर्गा मातेची भक्ती भावाने पुजा करतात. नवरात्र हा उत्सव फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या राज्यातील पध्दती वेगळ्या असल्या तरी विविधतेने हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.
नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना (Ghatsthapana). आजचा दिवस शैलपुत्री देवीला (Shailaputri Devi) समर्पित आहे. दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाला 'शैलपुत्री' ((Shailaputri) असं म्हणतात. नवदुर्गांपैकी ती पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची (Himalaya) कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलपुत्री असेही म्हणतात. हिमालयाच्या (Himalaya) पर्वतराजाची कन्या म्हणून जन्म घेतल्याने तिचे नाव 'शैलपुत्री' ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी योगी आपले मन 'मूलाधारा' चक्रात स्थापित करतात आणि येथूनच त्यांच्या योगसाधनेला सुरुवात होते. (हे ही वाचा:- Ghatasthapana 2022 Messages: घटस्थापनेच्या मराठमोळ्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारा देत खास करा नवरात्रीची सुरूवात!)
नवरात्रीची पहिली देवी शैलपुत्री आहे. आज दिवसभर देवी शैलपुत्रीचे ध्यान केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. शैलपुत्री देवीचे नामस्मरण केल्यास भय दूर होते, शांती आणि उत्साह प्राप्त होतो. ती आपल्या भक्तांना कीर्ती, ज्ञान, मोक्ष, सुख, समृद्धी प्रदान करते. शैलपुत्री मातेची उपासना केल्यास इच्छाशक्ती मजबूत होते.