Navratri 2022: आज माळ सातवी, जाणून घ्या आज दुर्गा मातेचं कुठलं रुप आणि कोणता रंग
पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी माँ दुर्गेच्या सातव्या रूपाची म्हणजेच कालीमातेची पूजा आणि उपसना केला जाते.
शारदेय नवरात्रीचा (Navratri 2022) उत्साह दिवसेंदिवस रंगताना दिसत आहे. आज नवरात्राचा (Navratri) सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या (Durga Mata) नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या जाते. आज नवरात्राची सातवी माळ असून नवदुर्गेचे सातवं रुप स्वरुप म्हणजे कालीमातेला (Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग केशरी (Orange) म्हणजेचं भगवा रंग आहे. नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसात देवीच्या नावाने नऊ दिवस व्रत (Fast) केले जाते तसेच नऊ रुपांची भक्ती भावाने पूजा केल्या जाते. काही भाविक आपल्या घरी घटची स्थापना (Ghatsthapna) करत दुर्गा मातेची भक्ती भावाने पुजा करतात. नवरात्र हा उत्सव फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या राज्यातील पध्दती वेगळ्या असल्या तरी विविधतेने हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.
आज शारदीय नवरात्रीचा सातवा (Navratri Day 7) दिवस आहे. पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी माँ दुर्गेच्या सातव्या रूपाची म्हणजेच कालीमातेची पूजा आणि उपसना केला जाते. माँ दुर्गेचे सातवे रूप म्हणजेच देवी कालरात्री काळ्या रंगाची आहे. त्यामुळे त्याला कालरात्री असे नाव पडले. माँ अंबेचे हे रूप शक्तीचे उग्र रूप मानले जाते. जर तुम्हाला माता कालरात्री म्हणजेचं कालीमातेला प्रसन्न करायचे असेल तर तिचे आवडते फूल रातराणी तिला अर्पण करा. कालरात्रीची पूजा ही पूजा निशा कालात म्हणजेच रात्री केल्यास तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होतात. माँ कालरात्रीची आराधना केल्याने निर्भयतेचा आशीर्वाद मिळतो. (हे ही वाचा:-Navaratri 2022: नवरात्रीच्या 9 दिवसांत देवीच्या 'या' मंदिरात महिलांना जाण्यास बंदी; जाणून घ्या काय आहे मान्यता)
गूळ (Jaggery) किंवा गुळापासून बनवलेली कोणतीही वस्तू कालरात्रीला प्रसाद म्हणून अर्पण करावे. सप्तमीच्या रात्री, भक्त शृंगार पूजा देखील करतात. माँ कालरात्रीला दैवी प्रकाशमान आणि ज्ञानाचा अखंड झरा म्हणून ओळखले जाते. कालीमाता ही शनी ग्रहावर राज्य करते. देवी कालरात्रीची उपासना करणार्यांना सौभाग्याबरोबरच बुद्धीही मिळते. तसेच कालीमातेची पूजा करताना ओम देवी कालरात्री नम: या मंत्राचा जप केल्या विशेष फळ मिळते.