Navratri 2020: नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते? जाणून त्याचं महत्त्व आणि खास मंत्र!

मां शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा नऊ देवीच्या रूपाची पुजा केली जाते.

नवरात्रोत्सव (File Photo)

नवरात्र हा आदिशक्तीचा जागर करण्याचा सण आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये शारदीत नवरात्र (Navratri) उत्सवाला सुरूवात होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान नऊ रात्रींमध्ये हा सण साजरा केला जाणार आहे. देशभरामध्ये यंदा कोरोनाचं सावट असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाची (Navratrotsav) धामधूम नसेल त्यामुळे घरच्या घरी यंदा नवरात्र साजरी करताना कोणत्या क्रमाने देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते? याबद्दल तुमच्या मनात संभ्रम असेल तर जाणून घ्या हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार, नवरात्रीमध्ये नवदुर्गेची उपासना करताना कोणत्या दिवशी कोणतं रूप पुजलं जातं? तिचं वैशिष्ट्य काय आणि नामस्मरण करताना कोणत्या देवीची कशी पूजा कराल? कोणता मंत्र जपाल? (नवरात्री नऊ रंग 2020 मध्ये घटस्थापना ते दसरा दरम्यान पहा यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?)

मां शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा नऊ देवीच्या रूपाची पुजा केली जाते. घटस्थापनेपासून पुढील 9 दिवस प्रत्येकी एक माळ वाढवली जाते. त्यामुळे दररोज पूजेमध्ये पहा कोणत्या देवीची कशी कराल उपासना? Navratri 2020 Virtual Celebration Ideas: कोविड-19 संकटात यंदा व्हर्च्युअल माध्यमातून साजरा करा नवरात्रोत्सव; पहा सेलिब्रेशनच्या विविध आयडियाज.

नवरात्रीमधील नवदुर्गांच्या पुजा विधी कशा कराल?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गेच्या पहिल्या रूपाचं म्हणजे शैलपुत्रीचं पुजन केले जाते. हिमालयाच्या घरी मुलीच्या रूपाने आलेल्या शैलपुत्रीच्या हातामध्ये त्रिशुल आणि कमळ असतं. ती बैलावर विराजमान असते.

मंत्र- ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम: ।।

ब्रह्मचारिणी ही नवदुर्गेमधील दुसरी देवी आहे. ब्रह्म शब्द चा अर्थ तपस्या. तिच्या एका हातामध्ये कमळ आणि एका हातामध्ये माळ असते.

मंत्र- या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी के रूप में संस्था। नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ।

दुर्गेचं तिसरं रूप हे चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी तिचं पूजन केले जातं. तिच्या डोक्यावर चंद्र आहे. तर शरीत सोन्याप्रमाणे कांतीमय आहे. सिंह हे तिचं वाहन आहे.

मंत्र: पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता।।

दुर्गेचे चौथं रूप कुष्मांडा आहे. मंद आणि स्मितहास्यामुळे तिचं नाव कुष्मांडा ठेवण्यात आलं आहे.

दुर्गेच्य या रूपाची आराधना करणारी व्यक्ती मुक्त होते आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते अशी आराधना आहे.

मंत्र- 'ॐ कूष्माण्डायै नम:।।

दुर्गेचं नववं आणि शेवटचं रूप हे सिद्धीदात्री आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तिची आराधना केली जाते. तिच्या उपासनेने मनोकामना पूर्ण होतात.

मंत्र- ॐ सिद्धिदात्र्यै नम:।

भारतामध्ये नवरात्रीचा जागर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. उत्तर भारत आणि गुजरात मध्ये नवरात्रीची विशेष धूम असते. तर महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठांमध्ये विशेष स्वरूपात नवरात्र साजरी होते. सोबतच भोंडला खेळला जातो. तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते.