नवरात्रोत्सव 2018 : मुंबईतील या '5' लोकप्रिय दांडिया / गरबा नाईट्समध्ये थिरकायला सज्ज व्हा !

पहा यंदा मुंबईत फाल्गुनी पाठक, प्रीति-पिंकी यांच्या तालावर कुठे थिरकायला मिळणार ?

गरबा नाईट्स Photo credits: You Tube

नवरात्रीचं एक खास आकर्षण असतं ते म्हणजे गरबा. तरूणाईमध्ये दांडिया आणि गरब्याचं विशेष आकर्षण असतं. मुंबईतील अनेक मैदानांवर दांडिया आणि गरब्याचं भव्य स्वरूपात आयोजन केलं जातं. फाल्गुनी पाठक या दांडिया क्विनपासून अनेक सेलिब्रिटींचा दांडिया आणि गरबा लोकप्रिय आहे. मग तुम्हीदेखील अशाच काही भव्य स्वरूपातील दांडिया आणि गरना नाईट्सचा प्लॅन करत असाल, तर मुंबईतील या काही ठिकाणी नक्की भेट द्या.

मुंबईतील पश्चिम उपनगर आणि मध्य मुंबईतील घाटकोपर,वरळी या भागात प्रामुख्याने भव्य स्वरूपात गरब्याचं आयोजन केलं जातं. नवरात्रोत्सव 2018 : यंदा 'या' नऊ रंगांमध्ये साजरा करा नवरात्रोत्सवाचा सण !

1. फाल्गुनी पाठक ( बोरीवली )

दांडिया आणि फाल्गुनी पाठक हे समीकरणच आहे. दांडिया क्विन अशी ओळख असलेल्या फाल्गुनी पाठकच्या तालावर थिरकायला तरूणाई सज्ज असते.

कुठे आहे ? प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स - बोरीवली पश्चिम

प्रवेश फी - 700 रूपये

2. प्रीति -पिंकी

प्रीति - पिंकी हे देखील नवरात्रीमधील एक लोकप्रिय नाव आहे. प्रीती आणि पिंकी या दोन गायिकांचा दमदार आवाज तुम्हांला ठेका धरायला लावतो. मागील 25 वर्षांपासून या दोन गायिका देशा-परदेशात अनेक स्टेज शोज करत आहेत.

कुठे आहे ? कच्छी ग्राऊंड, ऑरा हॉटेलजवळ, लिंक रोड, बोरीवली पश्चिम

प्रवेश फी - किमान 300 रूपये

3. रंगिलो रे

पार्थिव गोहिलचे तुम्ही फॅन असाल तर यंदाच्या दांडियामध्ये तुम्हांला थिरकायला आणि दांडियाचा आनंद द्विगुणित करायला गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्सला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी अस्सल गुजराती पदार्थांची मेजवानीदेखील चाखायला मिळते. सोबत काही लोकल आर्टिस्टच्या कला पहायला मिळतील.

कुठे आहे ? नेस्को कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव पूर्व

प्रवेश फी - किमान 500

4.कोराकेंद्र नवरात्री

कोराकेंद्रच्या ग्राऊंडवर 2001 सालपासून नवरात्रीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे. येथे मोठ्या स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. सुमारे 2 लाखाहून अधिक लोकं या ठिकाणाला भेट देतात. दर दिवशी किमान 30,000 लोकं या नवरात्रोत्सवाला भेट देतात. अनेक कलाकार मंडळींचाही या नवरात्रोत्सवात सहभाग असतो.

कुठे आहे ?

कोराकेंद्र ग्राऊंड, आर्यभट्ट रोड, हरिदास नगर, बोरिवली पश्चिम

प्रवेश फी : किमान 450

5. रेडिएन्स दांडिया 2018

सार्वजनिक ठिकाणं आणि मैदानांसोबतच यंदा फाईव्ह स्टार हॉटेल्समध्येही गरबा आणि दंडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या ऑक्टोबर हीटपासून तुम्हांला लांब रहायचं असेल पण तरीही गरबा एन्जॉय करायचाअसेल तर मुंबईतील सहारा हॉटेलच्या एसी हॉलमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

कुठे आहे ? हॉटेल सहारा स्टार, डोमेस्टिक एअरपोर्ट जवळ, विले पार्ले

प्रवेश फी : किमान 800 रूपये

मग यंदा नवरात्रोत्सवाचे उपवास सांभाळत, दांडिया आणि गरबा नाईट्समध्ये नाचायला सज्ज व्हा.. नवरात्रोत्सव 2018 :यंदा बॉलिवूडच्या या '4' नव्या गाण्यांवर नक्की रंगणार गरबा नाईट !