National Egg Day 2025 HD Images: राष्ट्रीय अंडी दिनानिमित्त खास Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
अंडी हा अनेक लोकांसाठी परवडणारा आणि सहज उपलब्ध असलेला अन्न पर्याय आहे. तो एक पौष्टिक पदार्थ असून, त्याचे नियमितपणे आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी चांगले आहे, मात्र ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे.
दरवर्षी 3 जून रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अंडी दिन’ (National Egg Day 2025) साजरा केला जातो. यंदा येत्या मंगळवारी हा दिवस साजरा होणार आहे. हा दिवस अंड्यांचे पौष्टिक मूल्य आणि स्वयंपाकातील त्याची अष्टपैलुत्व यांना समर्पित आहे. अंडी हे मानवजातीच्या आहारातील सर्वात प्राचीन आणि बहुमुखी खाद्यपदार्थांपैकी एक, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. तो विविध स्वादिष्ट पदार्थांमध्ये वापरला जातो. अमेरिकन एग बोर्डने 1996 मध्ये अंडी दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय अंडी दिनाचा उद्देश अंड्यांचे आरोग्यदायी फायदे आणि स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. हा दिन अंड्याशी संबंधित नवीन व्यंजने शिकण्याची आणि पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देण्याची संधी आहे.
अंडी हा अनेक स्वयंपाकघरातील एक प्रमुख घटक आहे. एका अंड्यात सुमारे 6-7 ग्रॅम प्रथिने, 75 कॅलरीज, आणि व्हिटॅमिन A, B, D, E, B12, सेलेनियम, फॉस्फरस आणि झिंकसारखे पोषक घटक असतात, जे मेंदूच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहेत. अंड्यामधील कोलिन हा घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो. गर्भवती मातेच्या आहारात कोलिनचे योग्य प्रमाण असले तर नवजात शिशूची स्मरणशक्ती चांगली राहते. सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. राष्ट्रीय अंडी दिन हा अंड्यांचे पौष्टिक फायदे आणि त्याचा स्वयंपाकातील विविध उपयोग यांचा उत्सव आहे.
तर या दिनानिमित्त तुम्ही Messages, Quotes, Wishes, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, अंडी हा अनेक लोकांसाठी परवडणारा आणि सहज उपलब्ध असलेला अन्न पर्याय आहे. तो एक पौष्टिक पदार्थ असून, त्याचे नियमितपणे आहारात समाविष्ट करणे आरोग्यासाठी चांगले आहे, मात्र ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे. अनेक घरांमध्ये अंडी भुर्जी, ऑम्लेट, आणि अंडा करी लोकप्रिय आहे. तर या राष्ट्रीय अंडी दिनादिवशी तुम्ही असे काही पदार्थ किंवा, काही आंतरराष्ट्रीय पदार्थ बनवून पाहू शकता.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

