Narali Purnima 2024 HD Images: नारळी पौर्णिमा निमित्त Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!
तुम्ही देखील नारळी पौर्णिमेनिमित्त तुमच्या कोळी मित्र-मैत्रिणींना खालील नारळी पौर्णिमा मेसेज, नारळी पौर्णिमा कोट्स, नारळी पौर्णिमा व्हॉट्सॲप स्टेटस पाठवू शकता.
Narali Purnima 2024 HD Images: देशभरात श्रावण पौर्णिनेला भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण म्हणजेचं रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचं दिवशी महाराष्ट्र आणि कोकणी भागात नारळी पौर्णिमे (Narali Purnima 2024) चा सण साजरा केला जातो, याला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी समुद्राचे देव वरुण देव यांना प्रसन्न करण्यासाठी मच्छीमार समुद्रात नारळ अर्पण करतात. मच्छीमारांना त्यांच्या कामात नेहमी आशीर्वाद मिळावा, यासाठी ते वरुण देवाची पूजा करतात.
राज्यात कोकण भागात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील नारळी पौर्णिमेनिमित्त तुमच्या कोळी मित्र-मैत्रिणींना खालील नारळी पौर्णिमा मेसेज (Narali Purnima Messages), नारळी पौर्णिमा कोट्स (Narali Purnima Quotes), नारळी पौर्णिमा व्हॉट्सॲप स्टेटस (Narali Purnima Whatsapp Status) पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 Date and Significance: नारळी पौर्णिमेची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)
नारळी पौर्णिमेपासून मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते. या दिवशी मच्छीमार समुद्रात नारळ अर्पण करून भगवान वरुण देवाची विशेष प्रार्थना करतात. पूजा विधी पूर्ण केल्यानंतर, मच्छीमार त्यांच्या सजवलेल्या बोटी घेऊन समुद्रात जातात.