Narali Purnima 2019: श्रावणी पौर्णिमेदिवशी नारळी पौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा समुद्र पूजनाचा शुभ मुहूर्त काय?
श्रावणी पौर्णिमेदिवशी अनेक शुभ कार्यांना सुरूवात केली जाते. श्रावणी पौर्णिमा हा दिवस नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो.
Narali Purnima 2019 Muhurat: हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी एक असणार्या श्रावण महिन्याला (Shravan Month) महाराष्ट्रात 2 ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. यंदा 14 ऑगस्ट दिवशी महाराष्ट्रात श्रावणी पौर्णिमा (Shravan Purnima) साजरी केली जाणार आहे. श्रावणी पौर्णिमेदिवशी अनेक शुभ कार्यांना सुरूवात केली जाते. श्रावणी पौर्णिमा हा दिवस नारळी पौर्णिमा (Narali Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो. कोळी बांधवांसाठी हा सण फार महत्त्वाचा असतो. Narali Purnima 2019 Wishes: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा श्रावणी पौर्णिमा
श्रावणी पौर्णिमेदिवशी समुद्र किनारी राहणारा कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो. त्याच्या पूजनाने सारी संकट टळावी अशी कामना केली जाते. तसेच या दिवशी समुद्राची पूजा करण्याचीही प्रथा आहे. श्रावण हा मराठी महिना पावसाळा ऋतूमध्ये येतो. या काळात पावसामुळे समुद्राला येणारं उधाण तसेच माश्यांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारी थांबवली जाते. मात्र नारळी पौर्णिमेनंतर समुद्रामध्ये होड्या घेऊन जाण्यास, मासेमारी करण्यास सुरूवात केली जाते.
नारळी पौर्णिमा मुहूर्त
यंदा नारळी पौर्णिमा 14 ऑगस्ट दिवशी 15:47 ते 15 ऑगस्ट दिवशी 17:59 पर्यंत आहे. 14 ऑगस्टच्या संध्याकाळी नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेदिवशी नाराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये नारळी भात, नाराळाच्या वड्या असे गोडाधोडाचे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.