Mumbaicha Raja 2026 First Look: 'मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती' चा पहिला लूक आला समोर; यंदा 'पंढरपूरची वारी' या भक्तिमय थीमने सजला मंडप
मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीचा गणपती यंदा आपल्या ९९ व्या वर्षात पदार्पण करत असून, शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या मंडळाने यंदा 'पंढरपूरची वारी' या भक्तिमय संकल्पनेवर आधारित भव्य देखावा साकारला आहे.
लालबाग-परळ परिसरातील या मंडळाची स्थापना 1920 मध्ये झाली असून, जवळपास शतकभराची परंपरा असलेल्या या मंडळाने मुंबईकरांच्या श्रद्धेत विशेष स्थान मिळवले आहे. 14 सप्टेंबरला सकाळी सहा वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा होणार असून त्यानंतर भाविकांना पुढील 11 बाप्पा दर्शनासाठी खुला असेल. नक्की वाचा: Happy Ganesh Chaturthi Wishes in Marathi: गणेश चतुर्थीच्या मराठमोळ्या शुभेच्छा Images, Quotes, Messages द्वारा शेअर करत स्वागत करा बाप्पांचे.
'मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती' 2026 प्रथम दर्शन
'मुंबईच्या राजाची' यंदाची खास थीम: पंढरपूरची वारी
महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला अभिवादन करणाऱ्या या देखाव्यात वारकऱ्यांचा गजर, संत परंपरा, अभंग आणि भक्तिमय संस्कृतीचा सुंदर अनुभव भाविकांना अनुभवता येणार आहे. देखाव्याच्या मध्यभागी 22 फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती विराजमान करण्यात आली असून, संपूर्ण मंडपाची रचना पंढरपूरच्या वारीतील भक्तिभाव आणि सामूहिक श्रद्धेचे दर्शन घडवणारी आहे. वारकरी संप्रदायाची शिकवण आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हेतूही या संकल्पनेमागे असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित
दरवर्षीप्रमाणे यंदाही 11 दिवसांच्या उत्सव कालावधीत कोट्यवधी भाविक राजाच्या दर्शनासाठी 'मुख दर्शन' आणि 'चरण स्पर्श' या दोन स्वतंत्र रांगांमध्ये तासनतास उभे राहतील, अशी अपेक्षा आहे. गणेश गल्लीचा गणपती हा मुंबईतील सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या मंडळांपैकी एक असून, लालबागच्या राजासोबतच या मंडळाच्या दर्शनासाठीही भाविकांची मोठी रीघ पाहायला मिळते.
मंडळाकडून दरवर्षी गर्दी नियंत्रणासाठी आणि सुरळीत दर्शन व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन केले जाते. यंदाही सुरक्षा व्यवस्था आणि रांगांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Ganpati Invitation Card Template Marathi: गणपती दर्शनासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रण पाठवण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस.
शतकमहोत्सवाकडे वाटचाल
पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये गणेश गल्लीचा गणपती आपल्या शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाकडे एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि परिसरातील रहिवाशांमध्ये या ऐतिहासिक क्षणाबद्दल विशेष उत्साह दिसून येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2026 12:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

