Mother's Day DIY Card Ideas: मदर्स डे दिवशी यंदा आई साठी स्पेशल गिफ्ट म्हणून घरच्य घरी कशी बनवाल ग्रीटिंग कार्ड्स! (Watch Video)

यंदा आईला Happy Mother's Day विश करण्यासाठी घरच्या घरी कशी बनवाल क्रिएटीव्ह ग्रीटिंग कार्ड्स!

Mother's Day DIY Cards |Photo Credits: Pixabay.com

जगभरात यंदा 10 मे दिवशी मदर्स डे (Mother's Day) साजरा केला जाणार आहे. यावर्षी जग कोरोना व्हायरस संकटाशी लढत असल्याने अनेक ठिकाणी सरकारने सक्तीने लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान संचारबंदीच्या नियमांमुळे तुम्हांला यंदा बाहेर पडण्याची, फिरण्याची मुभा नाही. त्यामुळे यंदाचं सेलिब्रेशन हे घरी बसूनच करणं भाग आहे. दरवर्षी मे महिन्यातला दुसरा रविवारी तुम्ही आईसोबत सेलिब्रेट करताना विशेष प्लॅन्स बनवत असतात यामध्ये भटकणं असेल, शॉपिंग असेल किंवा आवडत्या हॉटेल, रेस्टारंटमध्ये पदार्थांवर ताव मारणं असेल. पण तुमचे हे सारे प्लॅन्स बारगळणार आहेत. कोरोनाची वाढती भीती पाहता यंदा आईसाठी मदर्स डे गिफ्टची शॉपिंग करणं थोडं कठीण आहे. पण यंदाचा मदर्स डे तुम्हांला स्पेशल करायचा असेल तर थोडी तुमची क्रिएटीव्हिटी वाढवा. लॉकडाऊनचा मोकळ्या वेळेत थोडा आऊट ऑफ द बॉक्स विचार करा आणि घरच्याघरीच काही स्पेशल प्लॅन्स बनवा. Mother's Day 2020 Gift Ideas: यंदा लॉकडाऊनमध्येही 'मदर्स डे' स्पेशल करू शकतात ही खास गिफ्ट्स!

गिफ्टमध्ये जेव्हा तुमची मेहनत दिसते तेव्हा ती महाग, स्वस्त अशी राहत नाही. आणि आता तर तुम्ही आईसाठी गिफ्ट्स प्लॅन करताय तर ते मूळीच किंमतीत मोजलं जाणार नाही. यंदा सर्वसामान्य घरात बच्चेकंपनीसह सारेच लॉकडाऊनमुळे घरी असतील मग यंदा आईबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी घरच्या घरीच काही ग्रीटिंग कार्ड्स बनवा आणि तिला सरप्राईज करा. यामुळे मुलांचादेखील क्वारंटीन मधला वेळ थोड क्रिएटीव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतून राहण्यास मदत होऊ शकते.

 DIY MOTHER'S DAY CARDS

Handmade Card for Mom

Mother's Day Greeting Card

 SURPRISE MESSAGE CARD

ग्रीटिंस ही खूप स्पेशल गोष्ट असते. अनेकदा बाजारातून ग्रीटिंग्स विकत घेऊन तुम्ही आईला 'थॅक्यू' बर्‍याचदा म्हणाले असाल पण यंदा तुम्ही स्वत: बनवलेलं ग्रीटिंग आईला देऊन बघा. हे करताना तुम्हांला जितकी मज्जा येईल त्याहून अधिक मज्जा आईला ते न्याहाळताना बघताना येईल. अशा वस्तू तुम्हांला आणि आईला दोघांनाही एक खास आठवण देऊन जाईल नक्की

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now