Diwali Mehndi Designs: दिवाळी निमित्त झटपट मेहंदी काढण्यासाठी 'या' सोप्या पद्धती ठरतील फायदेशीर (Watch Video)

यंदा तुम्ही दिवाळीनिमित्त तुमच्या हातावर अगदी सोप्या पद्धतीने मेहंदी काढू शकता आणि आपल्या हातांना आणखी आकर्षक बनवू शकता.

Easy mehndi designs for Diwali (Photo Credits: YouTube Grab)

5-Minute Quick Mehndi Designs For Diwali 2019: दिवाळीचा सणाला (Diwali 2019) केवळ एक दिवस उरला आहे. या दिवशी मेहंदीचे मोठे महत्त्व असते. त्यामुळे घरातील महिला, मुली हातावर मेहंदी काढतात. परंतु, अनेक महिला नोकरी किंवा इतर कामांमध्ये व्यग्र असल्याने त्यांना यादिवशी मेहंदी काढण्यास वेळ मिळत नाही. मात्र, अशा महिलादेखील आता 5 मिनिटांमध्ये हातावर मेहंदी काढू शकणार आहेत. कारण, ‘लेटेस्ली मराठी’ तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या मेहंदी डिझाईन. (Mehndi Designs) यंदा तुम्ही तुमच्या हातावर अगदी सोप्या पद्धतीने मेहंदी काढू शकता आणि आपल्या हातांना आणखी आकर्षक बनवू शकता. चला तर मग पाहुयात सोप्या आणि अगदी साध्या मेहंदी डिझाईन्स.

हेही वाचा - Diwali 2019: दिवाळीनिमित्त काढा ‘या’ खास मेहंदी डिझाईन्स

दिवाळीमध्ये महिला आणि मुलींची स्पेशल तयारी सुरू असते. दिवाळीसाठी कोणता ड्रेस घालायचा? कोणती मेहंदी डिझाईन काढायची? असे अनेक प्रश्न महिलांना पडत असतात. अनेकदा काहींना मेहंदी काढायला वेळ नसल्यामुळे त्या हातावर मेहंदी स्टिकर्स काढतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला मेहंदीच्या काही सोप्या डिझाईन्स दाखवणार आहोत. त्यामुळे केवळ 5 ते 10 मिनिटांत तुमचा हात अगदी सुंदर दिसू शकतो.

आकड्याच्या साहाय्याने काढा खास डिझाईन - 

तुम्हाला मेहंदी काढता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून सुरेख मेहंदी काढू शकता. इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात संख्या टाकवून तुम्ही ही सोपी मेहंदी काढू शकता. ही मेहंदी डिझाईन अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला केवळ 5 मिनिटांचा कालावधी लागेल.

ब्रासलेट मेहंदी डिझाईन - 

कमी वेळेत ब्रासलेट मेहंदी डिझाईन काढणं अगदी सोप आहे. ही मेहंदी काढल्यानंतर तुम्ही मेहंदी सुकेपर्यंत कामही करू शकता. तसेच या डिझाईनमुळे तुमचे मनगट अगदी सुंदर दिसेल. ही मेहंदी डिझाईन अगदी 5 मिनिटांत तयार होते.

बोटांवर काढायची सोपी डिझाईन - 

ब्रासलेट मेहंदी डिझाईनला पर्याय म्हणून तुम्ही बोटांवरही मेहंदी काढू शकता. बोटांवर मेहंदी काढल्याने तुमच्या हाताचे सौदर्यं अधिक खुलून दिसेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहून अगदी सोप्या पद्धतीने मेहंदी डिझाईन काढू शकता.

नाण्यांच्या साहाय्याने काढा खास मेहंदी डिझाईन - 

तुम्ही नाण्यांच्या साहाय्याने अगदी सोप्या टिप्सचा अवलंब करून मेहंदी काढू शकता. यासाठी तुम्हाला 10 आणि 5 रुपयांच्या नाण्यांची आवश्यकता आहे. हातावर नाणे ठेवून त्याभोवती ठिपके देऊन तुम्ही गोल आकाराचे फुल तयार करू शकता आणि आकर्षक मेहंदी काढू शकता.

वर दिलेल्या मेहंदी डिझाईन्स तुम्ही आपल्या हातावर काढू शकता. या सर्व मेहंदी डिझाईन्स अगदी सोप्या असून तुम्ही त्या केवळ 5 ते 10 मिनिटांत काढू शकता आणि दिवाळीला तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या मेहंदीचा रंग अधिक खुलवायचा असेल तर, तुम्ही यासाठी मेहंदी सुकल्यानंतर त्यावर साखर आणि लिंबाचे पाणी लावू शकता. त्यामुळे तुमच्या मेहंदीचा रंग अधिक गडद होईल.