Matru Suraksha Din 2021:मातृ सुरक्षा दिनानिमित्त जाणून घ्या अधिक माहिती आणि हे Quotes, Messages, WhatsApp Image शेअर करत करा आईचा सन्मान

साल 2005 पासून जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याची जगभर अंमलबजावणी सुरू केली.मातांचे आरोग्य हे हा दिवस साजरा कऱण्यामागचा हेतू आहे.

Matru Suraksha Din 2021:मातृ सुरक्षा दिनानिमित्त जाणून घ्या अधिक माहिती आणि हे Quotes, Messages, WhatsApp Image  शेअर करत करा आईचा सन्मान
Matru Suraksha Din 2021 ( File Photo )

दर वर्षी 10 जुलै रोजी जगभरात ‘मातृ सुरक्षा दिन' साजरा केला जातो.साल 2005 पासून जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याची जगभर अंमलबजावणी सुरू केली.मातांचे आरोग्य हे हा दिवस साजरा कऱण्यामागचा हेतू आहे.मातांचे आरोग्य आणि मातृत्वादरम्यान मांतांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित करण्याचा हा दिवस.आईचे आरोग्य आणि विशेषतः गरोदर पणाच्या कालावधीत होणा-या मृत्युदरात झालेली वाढ, याबाबत जनजागृकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.दर वर्षी  11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस (World Population Day) साजरा केला जातो. लोकसंख्येची वाढ आणि नवमातांचे आरोग्य (New Mother's Health) याचा संबंध जोडून 10 जुलै हा दिवस निवडण्यात आलेला आहे. (Matru Suraksha Din: दरवर्षी 10 जुलै ला का साजरा केला जातो मातृ सुरक्षा दिवस? कधी आणि कशी झाली याची सुरुवात जाणून घ्या )

गरोदर पणात अनेक महिला ब्लड प्रेशर, हृदयाशी संबंधितआजार, खुप रक्तस्त्राव यामुळे प्राण गमावतात. अशा वेळी योग्य माहिती असणे आणि त्या महिलेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच दोन मुलांमध्ये किती वर्षाचे अंतर ठेवावे, गरोदरपणात कशी काळजी घ्यावी. या गोष्टी माहित असणे ही तेवढेच महत्वाचे आहे.

आजच्या दिवशी जिच्यामुळे आपण या सुंदर जगात प्रवेश केला त्या आपल्या आईचे आभार मानण्यासाठी हे खास संदेश तिला नक्की पाठवा.

  • आई

    तुझ्या चेहर्‍यावरील हास्य हे असेच राहू दे

    आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे...

  • कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान

    म्हणजे आई ...

  • देव’ प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही

    म्हणून त्याने तूला निर्माण केलंय आई...

  • स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

दरवर्षी 'मदर्स डे' मोठया उत्साहात साजरा केला जातो. पण सुरक्षित मातृत्व साजरे करण्यासाठी आजचा हा मातृ सुरक्षा दिवस मुख्य आहे. जगभरातील सर्व मातांना लेटेस्टली मराठी कडून शुभेच्छा आणि यापुढे नवमातांच्या मृत्यूचा दर घटून नाहीसाच व्हावा अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2021 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).