Matru Suraksha Din 2020: मदर्स डे आणि मातृ सुरक्षा दिवसात काय आहे फरक? जाणून घ्या

या दिवसाप्रमाणे आपण मे महिन्यात 'मदर्स डे' देखील साजरा करतो. त्यामुळे, मदर्स डे आणि मातृ सुरक्षा दिवसात नक्की फरक काय आहे? बरं तर, शीर्षक पाहूनच एखाद्याला फरक काय आहे हे कळलंच असेल.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: Getty)

Matru Suraksha Divas: 10 जुलै रोजी जगभरात ‘मातृ सुरक्षा दिन' साजरा केला जातो.जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) 2005 पासून हा दिवस जगभरात साजरा करण्याची सुरुवात केली. आईचे आरोग्य आणि विशेषतः गरोदर पणाच्या कालावधीत होणाऱ्या मृत्युदरात झालेली वाढ याबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी आणि यावर उपाययोजना करण्याची गरज जाणवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाप्रमाणे आपण मे महिन्यात 'मदर्स डे' देखील साजरा करतो. त्यामुळे, मदर्स डे आणि मातृ सुरक्षा दिवसात नक्की फरक काय आहे? बरं तर, शीर्षक पाहूनच एखाद्याला फरक काय आहे हे कळलंच असेल. स्त्रियांचे आरोग्य, विशेषतः गरोदर महिलांमध्ये प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या मृत्यूबाबत जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. दुसरीकडे, मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणार 'मदर्स डे' हा परिवारातील आईचा तसेच मातृत्व बंधांचा आणि समाजातील मातांच्या प्रभावाचा सन्मान करणारा उत्सव आहे. (Matru Suraksha Din 2020: दरवर्षी 10 जुलै ला का साजरा केला जातो मातृ सुरक्षा दिवस? कधी आणि कशी झाली याची सुरुवात जाणून घ्या)

गर्भवती महिलांची योग्य काळजी आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 11 जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो. गर्भधारणेदरम्यान महिलेसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजनांची आवश्यकता असते आणि त्यांच्यसाठी महत्त्वाचे उपाय राबविण्याचे उद्दीष्ट म्हणून मातृ सुरक्षा दिन म्हणून ओळखला जाणारा आजचा हा दिवस साजरा केला जातो. आई मुलांची काळजी घेते आणि त्यांचे पालन करत, परंतु स्वत:ची काळजी घेणे मात्र ती विसरते, अशा परिस्थितीत आईच्या आरोग्याची चिंता करणे आपले कर्तव्य आहे. स्त्रिया आणि मातांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे.

दरवर्षी 'मदर्स डे' मोठया उत्साहात साजरा केला जातो. पण सुरक्षित मातृत्व साजरे करण्यासाठी आजचा हा मातृ सुरक्षा दिवस मुख्य आहे. आजच्या या दिवशी आणि जगभरात जेव्हा कोरोना सारखा प्राणघातक व्हायरस पसरला असताना आम्ही जगभरातील सर्व मातांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो आणि नवमातांचा मृत्यूचा दर घटून नाहीसाच व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो.