Matru Din 2020 HD Images: मातृ दिनानिमित्त Wishes, Messages, Whatsapp Status, HD Greetings, Wallpapers च्या माध्यमातून आईसाठी आपल्या भावना व्यक्त करत द्या शुभेच्छा!
असे हे आईसाठी शब्द आपल्या मनाला चटका लावून जातात. आई सारखे दैवत जगतात कोठे ही नाही असे सुद्धा म्हटले जाते. कारण आई ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी झटून आपले कर्तव्य चोखपणे बजावत असते.
Matru Din 2020 HD Images: 'आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उतरत नाही'. असे हे आईसाठी शब्द आपल्या मनाला चटका लावून जातात. आई सारखे दैवत जगतात कोठे ही नाही असे सुद्धा म्हटले जाते. कारण आई ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी झटून आपले कर्तव्य चोखपणे बजावत असते. आईबद्दल शब्द सुद्धा अपुरे पडतील म्हणूनच आज असणाऱ्या श्रावण दर्श अमवास्येला पिठोरी अमावस्या अर्थात 'मातृ दिन' असे सुद्धा संबोधले जाते. पिठोरी अमावस्येला व्रत करण्याचे सुद्धा फार महत्व आहे. कारण असे म्हटले जाते की, ज्या आईची मुले अल्पायुषी ठरतात किंवा अत्यल्पसुख लाभत नाही अशी माता हे व्रत ठेवते त्या व्रताला 'पिठोरी अमावस्या व्रत' म्हणतात.
पिठोरी अमावस्येचे व्रत हे माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासह त्याच्या आरोग्य, जन्मासाठी करते. याच कारणास्तव आजचा दिवस 'मातृ दिन' म्हणूनची साजरा केला जातो. या दिवशी आईचा आशीर्वाद घेऊन तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर यंदाच्या मातृ दिनानिमित्त Wishes, Messages, Whatsapp Status, HD Greetings, Wallpapers च्या माध्यमातून आईसाठी आपल्या भावना व्यक्त करत द्या शुभेच्छा! (भारतामध्ये पिठोरी अमावस्या दिनी मातृदिन का साजरा केला जातो?)
पिठोरी अमावस्या साजरा करण्यामागे एक कथा आहे. ती म्हणजे विदेही नामक स्त्रीचे पुत्र अल्पायुषी ठरली. म्हणून तिने वनात जाऊन योगिनींना प्रसन्न करुन तिचे पुत्र जिवंत व्हावेत अशी प्रार्थना केली. त्यानुसार तिच्या मातृत्वाचा विजय होत 64 योगिनींच्या आशीर्वादाने तिचे सर्व पुत्र जिवंत झाले.