Marathi Rajbhasha Din 2023 Wishes: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Wishes, Quotes द्वारा देत खास करा आजचा दिवस
हा निर्णय 21 जानेवारी 2013 या दिवशी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' (Marathi Bhasha Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) ऊर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. मग मराठी ही मातृभाषा असणार्या आणि मराठीवर प्रेम करणार्या सार्यांसाठी हा दिवस खास असल्याने या दिवसाच्या शुभेच्छा, मराठमोळी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, Messages, Wishes तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देऊन हा दिवस खास करा.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे देशात राज्यांची भाषावार प्रांतरचना झाली. त्यानंतर 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. पण, कोणत्याही भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतींची मंजूरी आवश्यक असते. दुर्दैवाने ही मान्यता अद्याप मराठी भाषेला मिळाली नाही.पण विविध स्तरांमधून आता त्याबाबतचा मराठी भाषकांचा लढा कायम आहे. नक्की वाचा: Marathi Official Language Day 2023 : मराठी राजभाषा दिन; महत्त्व, स्वरुप आणि विस्तार, घ्या जाणून .
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रुजवू मराठी, फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मायबोली माझी मराठी
तिच्यात मायेचा ओलावा
वेगवेगळ्या शब्दालंकारात
घेते हृदयातील खोलावा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा दिनाच्या सार्या
मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रामध्ये 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय झाला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 या दिवशी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.