Mangal Pandey 192nd Birth Anniversary: क्रांतिकारी मंगल पांडे यांच्या विषयी 5 खास गोष्टी
धडाडी आणि बंडखोर अशा क्रांतिवीर मंगल पांडे यांच्याविषयी अशा 5 खास गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
Mangal Pandey Jayanti 2019: इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणा-या धडाडी, क्रांतिकारी नेते मंगल पांडे (Mangal Pandey) यांची आज 192 वी जयंती. 19 जुलै 1827 साली मंगल पांडे यांचा जन्म झाला. ते ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेची 34 वी बंगाल नेटिव इनफैंट्री मध्ये तैनात होते. त्यांचे नाव 'भारतीय स्वाधीनता संग्राम' यांच्या केंद्रस्थानी असलेला योद्धा म्हणून घेतले जाते. जेव्हा त्यांना कळले की रायफल एनफिल्ड P53 मध्ये काडतूसांवर गाय आणि डुक्करांची चरबी लावली जात आहे. तेव्हा त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. किंबहुना तेव्हाच त्यांनी इंग्रजांचे हिंदूं आणि मुस्लिमांचे धर्म भ्रष्ट करण्याचे मनसुबे समजले होते.
अशा या धडाडी आणि बंडखोर अशा क्रांतिवीर मंगल पांडे यांच्याविषयी अशा 5 खास गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील. चला तर मग पाहूयात या 5 गोष्टी:
1. गाय आणि डुक्कराची चरबी लावलेली काडतूसे वापराच्या निषधार्थ इंग्रजांविरुद्ध जे बंड पुकारण्यात आले होते, त्याचे नेतृत्व मंगल पांडे करत होते.
2. याच विरोधात त्यांनी 29 मार्ट 1857 मध्ये बैरकपूर मध्ये आपल्या सैन्याला इंग्रजांविरुद्ध उभे केले आणि एका इंग्र अधिका-याला गोळी मारली.
3. स्वातंत्र्यलढ्यातील मंगल पांडे हे सर्वात पहिले क्रांतिकारी होते, ज्यांनी देशवासियांमध्ये स्वतंत्रेची भावना निर्माण केली होती.
4. मंगल पांडे यांना 6 एप्रिल 1857 ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार 18 एप्रिल 1857 त्यांना फाशी देणे अपेक्षित होती. मात्र ईस्ट इंडिया कंपनीविषयी लोकांमधील वाढता रोष लक्षात घेता, त्यांना 8 एप्रिल 1857 ला च फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
5. बैरकपूर मध्ये फाशी देणा-या जल्लादांनी मंगल पांडे यांना फाशी देण्यास नकार दिला होता. बैरकपूर मधील जल्लादांनी जेव्हा मंगल पांडे यांना फाशी देण्यास नकार दिला तेव्हा कोलकातामधून 4 जल्लादांना बोलाविण्यात आले होते.
हेही वाचा- जाणून घ्या झाशीच्या राणीविषयी अशा 10 गोष्टी ज्या ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
मंगल पांडे नी ब्रिटीश अधिका-याला जिथे गोळी मारली होती, तितके मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. मात्र मंगल पांडे नी जी स्वातंत्र्यलढा सुरु केला होता, त्यात नंतर अनेक क्रांतिकारी सामील झाले.