Makar Sankranti 2021 Messages: मकर संक्राती निमित्त मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा

त्यामुळे तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना यंदा मकर संक्राती निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

Makar Sankranti 2021 Messages: मकर संक्रांती हा हिंदूंचा मुख्य उत्सव आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारतात तसेच नेपाळमध्ये साजरा होणार सण आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी मकर संक्राती साजरी करण्याची प्रथा आहे. यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. भारतात मकर संक्रातीचा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो. तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात हा सण संक्रांती म्हणून साजरा केला जातो. (Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टी दान केल्यास होईल देवाची कृपा; वाचा सविस्तर)

मकर संक्रांती उत्सवाला काही ठिकाणी उत्तरायणी देखील म्हटले जाते. यंदा मकर संक्राती उत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी हा सण साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करणे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना यंदा मकर संक्राती निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images नक्की उपयोगात येतील. (Makar Sankranti 2021 Special Recipes: यंदा मकर संक्रांतीला घरी बनवा तिळाच्या लाडूसह तिळपापडी, तिळवडी सारख्या झटपट रेसिपीज, Watch Videos)

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

कणभर तीळ मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात

शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

अशाच गोड माणसांना मकर संक्रातीच्यां गोड गोड शुभेच्छा!

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Makar Sankranti 2021 Messages (Photo Credit - File Image)

भारत हा कृषीप्रधान देश आहे. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. तसेच हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो.