Makar Sankranti 2021 Mehndi Designs: मकर संक्रांतीला हातावर काढा या सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स
नवीन साडी परिधान करून देवाची उपासना करतात. या दिवशी काळ्या साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.या दिवशी बऱ्याच महिला आपल्या हातावर मेहंदी काढतात. त्यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते.
उद्या म्हणजेच 14 जानेवारी रोजी वर्षातला पहिला सण मकर संक्रांत (Makar Sankranti) साजरी केला जाईल.मकर संक्रांती संपूर्ण भारतात तसेच नेपाळमध्ये साजरा होणार सण आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी मकर संक्राती साजरी करण्याची प्रथा आहे.भारतात मकर संक्रातीचा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो.तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात हा सण संक्रांती म्हणून साजरा केला जातो. (Makar Sankranti Rangoli Design: मकर संक्रांतीला दारापुढे काढा 'या' सुंदर सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन )
मकर संक्रातीच्या दिवशी विवाहित महिला खास शृंगार करतात. नवीन साडी परिधान करून देवाची उपासना करतात. या दिवशी काळ्या साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.या दिवशी बऱ्याच महिला आपल्या हातावर मेहंदी काढतात. त्यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. तुम्हालाही यंदाच्या मकर संक्रांतीला आपल्या हाताचं सौंदर्य खुलवायचं असेल, तर खालील मेहंदी डिझाईन्स तुमच्या नक्की उपयोगी येतील.
पतंग डिझाईन मेहंदी
बॅक हॅन्ड मेहंदी
अरेबिक डिझाईन मेहंदी
गोल टीक्की मेहंदी डिझाईन
ज्वेलरी मेहंदी डिझाईन
मकर संक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो. या दिवशी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत साजरी करण्याची प्रथा आहे.