Makar Sankranti 2020: मकर संक्रांती च्या सणाला 'या' 5 गोष्टी आवर्जून करा
मकर संक्रांतीच्या सणाला 'या' 5 गोष्टी आवर्जून करा म्हणजे तुमचे वर्षही आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेले जाईल.
Makar Sankranti 2020: नव्या वर्षातील पहिला सण अखेर आला आहे. 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं म्हणत आपण मकर संक्रातीचा हा सण साजरा तर करतोच पण या सणाच्या निमित्तानेच वर्षाची सुरुवातही गोड होते असं म्हणायला हरकत नाही. देशातील विविध भागात साजरा होणाऱ्या या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. परंतु, हा सण नक्की कसा साजरा करायचे हे आज आपण बघणार आहोत. मकर संक्रांतीच्या सणाला 'या' 5 गोष्टी आवर्जून करा म्हणजे तुमचे वर्षही आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेले जाईल.
अभ्यंगस्नान
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये, गंगा आणि यमुना आणि इतर सर्व मोठ्या आणि छोट्या नद्यांमध्ये पवित्र स्नानाने शुभ दिवस सुरू होतो. असे मानले जाते की स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास शरीरातील सर्व आजार दूर होतात आणि आपल्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता जाते.
आरती
भारतीय पौराणिक कथांमध्ये, आरती करणे ही देवाबद्दल कृतज्ञता व आदर करण्याची कृती मानली जाते. मकर संक्रांतीलाही पवित्र स्नानानंतर लोक कापूरचा वापर करून आरती करतात आणि सूर्यदेवाला नमस्कार करतात.
दान दक्षिणा
पवित्र स्नानानंतर लोक 'दान दक्षिणा' ही करतात. काळ्या तिळाचे लाडू, तांदूळ, मसूर आणि गजक (तीळकूट) एका प्लेटमध्ये ठेवतात आणि देवाला अर्पण करतात. त्यात काळ्या तीळांची भर घातल्यास, आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मदत होते.
पतंग उडवणे
पतंग उडवण्याचा उत्सव म्हणून मकर संक्रांती हा सण ओळखला जाते. पतंग उडवण्याची परंपरा देशाच्या बर्याच भागात पाळली जाते.असे मानले जाते की सकाळच्या वेळेस सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतो आणि हिवाळ्यामुळे बरेच आजारपण उद्भवत असल्याने ही किरणे त्या सर्वांना पुसून टाकतात. आणि म्हणूनच सकाळच्या वेळी पतंग उडवली जाते.
Makar Sankranti 2020: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्याचे काय आहे महत्त्व? असा करा यंदाचा लूक
तिळगुळ आणि दही चिवडा
दान दक्षिणा केल्यावर लोक काळ्या तीळांचे लाडू खातात आणि त्याबरोबर ‘दही चिवडा’ देखील खातात. दही चिवडा सोबत गूळ किंवा साकार मिक्स करून खातात. उत्तर भारतातील काही भागात या डिशबरोबर त्या सीझनमधील भाजी देखील दिली जाते.