Makar Sankranti 2019: मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रम करण्याचं महत्त्व काय?
मकरसंक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत खास दिवशी हळदी -कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
Haldi Kumkum Dates in Makar Sankranti 2019: जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रात ! महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण भोगी, संक्रात आणि किंक्रांत अशा तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो. यंदा लीप वर्ष नसूनही मकर संक्रात 15 जानेवारी या दिवशी आली आहे. पुरुषांना जशी या सणाला पतंगबाजीचा आनंद लुटण्याची हौस आणि उत्सुकता असते तसाच हा सण स्त्रियांसाठी खास असतो. महाराष्ट्रात सवाष्ण महिला मकर संक्रांती दिवशी हळदी-कुंकू हा कार्यक्रम करतात. मकरसंक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत खास दिवशी हळदी -कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या सणाला वाण लुटण्याची देखील परंपरा आहे. Makar Sankranti 2019: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्यामागील महत्त्व!
मकर संक्रांतमधील हळदी कुंकवाचं महत्त्व
मकर संक्रात हा उत्तरायणामध्ये येणारा एक सण आहे. या काळात वातावरणातील लहरी साधना करणाऱ्यांसाठी फलदायी असतात असा समज आहे. त्यामुळे अशा दिवसात महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात. एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असते. वाण म्हणजेच भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो. म्हणूनच यादिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात, तिळगुळ, फुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात. सोबत एखादी लहानशी भेटवस्तू देऊन आनंद वृद्धिंगत करतात.
यंदा मकर संक्रांतीमधील हळदी कुंकवाचा मुहूर्त कधी ?
मकर संक्रांतीमधील हळदी कुंकू हे रथसप्तमी पर्यंत चालू असते त्यामुळे यंदा 15 जानेवारी पासून 12 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या सोयीने हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जाऊ शकतात.Makar Sankranti 2019 : यावर्षी 14 नाही तर, 15 जानेवारीला साजरी होईल मकर संक्रांती; जाणून घ्या पुण्यकाळ आणि सणाचे महत्व
हळदी कुंकवाप्रमाणेच, नवदांपत्यासाठी मकर संक्रांतीचा सण खास असतो. यादिवशी जावयाला आणि सुनेला खास भेट दिली जाते, लहान मुलांचे बोर न्हाण देखील याच दिवसांमध्ये केले जाते.