Teachers Day 2020: लोकांना साक्षरतेचे धडे देत महाराष्ट्राची सामाजिक रचना बदलणा-या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अमूल्य विचार

अशा देशातील पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्येष्ठ समाजसुधारक यांची शिक्षणाचे महत्व पटवून देणारे प्रेरणादायी विचार

Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule (Photo Credits: FB)

आज संपूर्ण देशभरात आजचा दिवस (5 सप्टेंबर) हा दिवस शिक्षक दिवस (Teacher's Day) म्हणून साजरा केला जात आहे. हे साजरा करण्यामागचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती. यांची शिक्षणावर नितांत श्रद्धा होती आणि आदर्श शिक्षक सर्व गुण त्यांच्यात होते. त्यामुळे हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मग अशा महान दिनी शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्राची सामाजिक रचना बदलणा-या समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. अधिकाधिक लोकांना साक्षर बनवणे हा एकच ध्यास त्यांना लागला होता. त्यांचे विचार आजही कायम प्रेरणा देतील असेच आहेत.

शिक्षण ही काळाची गरज असून त्याचे महत्त्व पटवून देणा-या या दाम्पत्यांना आपल्या प्रेरणादायी विचारांतून देशाला शिक्षणाची महत्त्वाची बाजू दाखवून दिली. अशा देशातील पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्येष्ठ समाजसुधारक यांची शिक्षणाचे महत्व पटवून देणारे प्रेरणादायी विचार

हेदेखील वाचा- Happy Teachers Day Wishes in Marathi: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन गुरुवर्यांना द्या अमूल्य भेट!

महात्मा जोतिबा फुले यांचे विचार

1. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

2. ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.

3. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

4. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

5. विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. Dr.Sarvepalli Radhakrishnan Quotes: शिक्षक दिन 2020 निमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार WhatsApp, Facebook वर शेअर करत शिक्षकांना म्हणा धन्यवाद

सावित्रीबाई फुले यांचे विचार

1. आपल्या सर्वात मोठ्या दुश्मनाचे नाव आहे अज्ञान

त्याला चिरडून टाका, त्याला पकडून मारा आणि आपल्या जीवनातून हाकलून टाका

2. शिक्षण घ्या, आत्मनिर्भर बना, मेहनती बना, काम करा ज्ञान आणि धन मिळवा

कारण अज्ञान असलात तर सर्वकाही हातातून निसटून जाईल.

शिक्षणाचे पुरस्कर्ते असणारे हे दोन महान भारतीय शिक्षक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करत अनेक संकटांना सामोरे जात कायम एकत्र राहून शिक्षणाचा प्रसार केला. म्हणून शिक्षक दिनानिमित्त या दोन महान शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम!