Mahatma Gandhi 150th Birth Anniversary: महात्मा गांधीं विषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी
अशा या धडाडी, हरहुन्नरी, तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधीविषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची महती शब्दात व्यक्त होऊ शकत नाही किंबहुना शब्द अपुरे पडतील अशीच आहे. देशसेवेचा ध्यास लागलेल्या गांधींनी सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालून संपुर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजच्या पिढीला जरी पटत नसले तरी त्यांचे विचार स्वातंत्र्यलढ्यात फार महत्त्वाचे ठरले. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाविषयी अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याने आपल्या पैकी बरेच जण अजाण आहेत. काही महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला न उलगडलेलं कोडं आहे.
अशा या धडाडी, हरहुन्नरी, तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधीविषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी
1. महात्मा गांधींचे शांततेचे नोबेल या पारितोषिकासाठी तब्बल 5 वेळा नामांकन झाले होते.
2. मोहनदास करमचंद गांधी यांनी तब्बल 4 महाद्वीप व 12 देशातील नागरिक हक्क चळवळ घडवून आणली.
3. ज्या देशाविरुद्ध (ग्रेट ब्रिटन) गांधीजीनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्या देशाने त्यांच्या मृत्यूनंतर 21 वर्षानी त्यांच्या नावाने टपाल तिकीट छापून त्यांचा सन्मान केला.
4. गांधीजी 1930 मध्ये प्रतिष्ठित Time मासिकाच्या मुखपृष्ठावर Time Person Of The Year म्हणून झळकले होते.
5. महात्मा गांधींनी जीवनातील 40 वर्ष दररोज साधारण 18 किमी चालायचे. त्यांनी 1913 ते 1938 पर्यंत जवळपास 79000 किमी अंतर कापले होते. हे अंतर पृथ्वीला 2 वेळा प्रदक्षिणा मारल्याइतके होईल.
6. स्टीव्ह जॉब्स हे महात्मा गांधी यांचे चाहते होते.त्यांचा गोल काचाचा चस्मा हा ते गांधीजींच्या चस्म्या सारखा म्हणून वापरत असत.
7. गांधीजी कडे एक नकली दातांचा सेट होता, जो की ते आपल्या कपड्यातील एक खिशामध्ये ठेवत असत. हेही वाचा- महात्मा गांधी 150 व्या जयंती निमित्त मध्य रेल्वे ची अनोखी मानवंदना; इंजिनावर झळकणार खास चित्र
8. भारतात तब्बल 53 आणि परदेशात 48 रोड हे महात्मा गांधींच्या नावाने ओळखले जातात.
9. स्वदेशी मालाचे पुरस्कर्ते असणा-या महात्मा गांधींनी खादीचा वापर वाढविण्यासाठी धोतर परिधान करण्यास सुरुवात केली. दक्षिण 1914 मध्ये दक्षिण आफ्रिकेवरून शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांनी धोतर नेसण्यास सुरुवात केली. त्याआधी ते पँट आणि कोट असा पेहराव करायचे.
10. त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात होते.
आपल्या कार्यातून, व्यक्तिमत्वातून, विचारातून जगाला शांततेचा संदेश देणा-या महान राष्ट्रपित्याला लेटेस्टली मराठीकडून कोटी कोटी प्रणाम.