Mahashivratri 2026 Wishes in Marathi: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, Messages, Greetings शेअर करुन शिव शंकराचा उत्सव करा साजरा

साल 2026 मधील महाशिवरात्रीची अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि शिवभक्तांसाठी खास निवडक मराठी शुभेच्छा संदेशांचा संग्रह.

Mahashivratri 2025 HD Image

मुंबई- हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा महाशिवरात्रीचा सण यंदा 15 फेब्रुवारी 2026 (रविवार) रोजी साजरा होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा मंगल दिन भाविकांसाठी भक्ती आणि उपासनेचा मोठा उत्सव असतो. यंदा या दिवशी 'सर्वार्थ सिद्धी योग' जुळून येत असल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

शुभ मुहूर्त आणि तिथी

पंचांगानुसार, माघ कृष्ण चतुर्दशी तिथीची सुरुवात 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:04 वाजता होईल आणि तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 वाजता होईल. महाशिवरात्रीमध्ये मध्यरात्रीच्या पूजेला (निशीथ काळ) अनन्यसाधारण महत्त्व असते, त्यामुळे 15 फेब्रुवारीच्या रात्री मुख्य विधी पार पडतील.

महाशिवरात्री 2026: खास मराठी शुभेच्छा संदेश

या पवित्र दिनी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना डिजिटल माध्यमांतून शुभेच्छा देण्यासाठी खालीलपैकी काही निवडक संदेश तुम्ही वापरू शकता:

"शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिवच ब्रह्म आहे! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!"

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

"बेलाचे पान वाहतो शिवाला, करतो वंदन दैवताला... सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना, हीच प्रार्थना शिवशंभो शंकराला! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा."

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस

"ज्या संकटावर नसतो कोणताही उपाय, तिथे फक्त एकच नामस्मरण 'ओम नमः शिवाय'! महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा."

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

"शंकराची शक्ती, शंकराची भक्ती, या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपल्या आयुष्यात नवी सुरुवात होवो! हर हर महादेव!"

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची तयारी

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर या मंदिरांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून दर्शनासाठी विशेष रांगा आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement