Maharashtra Din 2020 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठमोळे Messages, Greetings, Quotes, Hike Stickers च्या माध्यमातून शेअर करून द्या राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा!

Maharashtra Day

Happy MaharashtraDay 2020 : आज महराष्ट्र राज्याचा 60 वा महाराष्ट्र दिन आहे.    1 मे   1960 साली भाषावार प्रांतरचनेरचनेनुसार मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा हा दिवस जल्लोषाचा, अभिमानाचा असला तरीही संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी 107 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (Maharashtra Dinachya Shubhechya)  देताना या हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण केली जाते.  सध्या राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट गडद असल्याने त्याचं भव्य स्वरूपात सेलिब्रेशन केलं जाणार नाही. मात्र महाराष्ट्रासह जगभरात कानाकोपर्‍यात वसलेल्या मराठी लोकांसाठी यंदाचा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) खास करायचा असेल तर तुम्ही फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की शेअर करू शकता. महाराष्ट्र दिन मेसेज, महाराष्ट्र दिन शुभेच्छा, महाराष्ट्र दिन 2020 व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स यासाठी यंदा आम्ही बनवलेली मराठमोळी ग्रीटिंग्स, वॉलपेपर्स, शुभेच्छापत्र, SMS, HD Images,WhastsApp Stickers, GIFs शेअर करून तुम्ही यंदाचा महाराष्ट्र दिन डिजिटल युगात साजरा करून आनंद द्विगुणित करा. Maharashtra Din 2020 Quotes: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आपल्या राज्याचा पराक्रमी वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्रं!

मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून 60 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र ओळख मिळाली. दरम्यान अद्याप बेळगावसह सीमाभागावरील अन्य काही प्रदेशांचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी लढा सुरू आहे. दरम्यान त्यांच्या लढ्याला लवकर यश मिळो अशी कामना करत जगभरातील मराठी बंधु-भगिनींचा यंदाचा महाराष्ट्र राज्य निमिर्तीचा दिवस आनंदात, सुखा- समाधानात जावो ही कामना करत ही मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करायला मुळीच विसरू नका.

महाराष्ट्र दिन 2020 च्या शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा

जयजयकार तयाचा आसमंती घुमावा

सांडिले रक्त ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी

जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशी व्हावा

महाराष्ट्र  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

जय जय महाराष्ट्र माझा

मनी वसला शिवाजी राजा

वंदितो भगव्या ध्वजा

गर्जतो महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

दगड झालो तर 'सह्याद्रीचा' होईन!

माती झालो तर 'महाराष्ट्राची' होईन!

तलवार झालो तर 'भवानी मातेची' होईन!

अन पुन्हा मनुष्य जन्म मिळाला तर 'मराठीच' होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

विसरू नका हुतात्म्यांचे कष्ट

अखंड राखू  अपुला महाराष्ट्र!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

६०व्या महाराष्ट्र दिनाच्या

तमाम महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा!

जय महाराष्ट्र

Maharashtra Din 2020 Wishes| File Photo

जय जय महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र  माझा माझा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन 2020 Hike Stickers

via GIPHY

via GIPHY

महाराष्ट्र दिवस म्हटला की अभिमान गीत, महाराष्ट्र गीत यांनी सारं राज्य दणदणून जात असे. हुतात्मा चौकात शुरवीरांना श्रद्धांजली अर्पण करून खास परेड बघायला सामान्यांची गर्दी होत असे. पण यंदा भारतासह महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्र राज्य आणि प्रामुख्याने मुंबईत आहे. ही स्थिती पाहता अजुनही पुढील काही दिवस नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान या काळात महाराष्ट्र दिनाचं सेलिब्रेशन सार्वजनिक स्वरूपात करण्याऐवजी घरगुती स्वरूपात करा. अनावश्यक गर्दी टाळली तरच आपण सारे सुरक्षित राहू शकणार आहोत.त्यामुळे कोरोना संकटाच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राची लवकरात लवकर या महामारीतून सुटका करायची असेल तर यंदा प्रत्येक मराठी माणसाने संयम दाखवण्याची गरज आहे. तरच हा महाराष्ट्र चिरायू राहणार आहे.