Maharashtra Bendur 2020 Date: महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत

या जोडीदाप्रती असलेली कृतज्ञता म्हणून बेंदूर सण (Bendur Festival) साजरा होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नव्हे तर शेतकऱ्याकडे असलेल्या बैलांचा आणि एकूणच पशुधनाचा सण आहे. प्रामुख्याने बेंदूर हा मराठी सण आहे. पूर्णणे मराठमोळा.

Bendur | (Photo Credits: File Photo)

Maharashtra Bendur Festival 2020: साधारण आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान, बेंदूर (Bendur) हा सण साजरा होतो. इंग्रजी महिन्यात सांगायचे तर जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सण साजरा होतो. शेतकऱ्यांचा खरा जोडीदार अशी ओळख असलेल्या बैलांचा हा सण. या जोडीदाप्रती असलेली कृतज्ञता म्हणून बेंदूर सण (Bendur Festival) साजरा होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नव्हे तर शेतकऱ्याकडे असलेल्या बैलांचा आणि एकूणच पशुधनाचा सण आहे. प्रामुख्याने बेंदूर हा मराठी सण आहे. पूर्णणे मराठमोळा.

ज्या दिवशी बेंदूर हा प्रमुख सण असतो त्याच्या आधल्या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. काही लोक बंदूर सणादिवशीही घालातात. त्याच संध्याकाळी खांदेमळणी असते. खांदेमळणी ही सुद्धा एक खास विशेष. खांदेमळणी करताना गरम पाण्याने बैलांचे खांदे धुतले / शेकले जातात. बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. अनेकांना बैलांचा खांदा हा प्रकार काय माहिती नसेल. बैलाच्या वशींडापासूनचा पुढचा भाग आणि मानेचा वरचा भाग म्हणजे खांदा. खांदा शेखल्यानंतर त्याला हळद लावली जाते. दरम्यान, या वेळी गोठ्यात असलेल्या सर्वच जनावरांना गाई, म्हैस इत्यादींना चांगली वागणूक दिली जाते. (हेही वाचा, Maharashtra Bendur 2020 Messages: महाराष्ट्र बेंदूर सणा निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status शेअर करून व्यक्त करा बैलांप्रती कृतज्ञता)

Maharashtra Bendur 2020 Date: महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत - Watch Video

बेंदूर सणाच्या दिवशी सकाळपासूनच शेतकरी उत्साहात असतो. या दिवशी औताला आणि शेतीच्या सर्व कामांना सुट्टी असते. या दिवशी प्रामुख्याने बैलांना आणि इतर जनावरांना हिरवा चारा दिला जातो. साधारण दुपारनंतर बैलाला सजवायला घेतले जाते. त्याच्या शिंगाणा हिंगूळ (लाल/केशरी रंग) लावला जातो. त्यावर बेगड्या चिटकवल्या जातात. त्यात कणकीचे कंगण घातले जातात. त्यानंतर शिंगांना शेंब्या घातल्या जातात. पाठीवर झूल, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात चाळ घालतात. या दिवशी त्याला नवी वेसण, म्होरकी, कंडा घातला जातो. अगदी कासराही नवा असतो. त्याच्या अंगावर रंगांचे ठसे उमठवले जातात. त्यानंतर त्याची पूजा करुन त्याला गावदेवासाठी नेले जाते. हा सर्व लवाजमा गावच्या वेशीत पोहोचतो तेव्हा गावकरी बैलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतात.