Maharana Pratap Jayanti 2019: मेवाडचे 13 वे राजपुत्र महाराणा प्रताप यांची 479 वी जयंती; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी

महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू राजपूत होते. आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पाहूया त्यांच्याबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी

महाराणा प्रताप जयंती 2019 (Photo Credit: Wikimedia Commons)

आपली वीरता, बहादुरी आणि हळदीघाटातील लढाईसाठी (Battle of Haldighat) प्रसिध्द असलेल्या महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांची आज, म्हणजेच 9 मे रोजी 479 वी जयंती. इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी ज्यांचे नाव कोरले गेले असे, महाराणा प्रताप मेवाड घराण्याचे 13 वे राजपुत्र (King of Mewar) होते. ज्यांचा जन्म मेवाडच्या शाही घराण्यात 9 मे 1540 रोजी झाला. महाराणा उदयसिंह आणि माता जयवंताबी यांच्या पोटी, कुंभलगड इथे त्यांचा जन्म झाला. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू राजपूत होते. आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पाहूया त्यांच्याबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी.