Maha Shivratri 2020: महाशिवरात्रीला नक्की करा 'हे' पाच प्रभावी उपाय; दूर होतील समस्या, धन-संपतीमध्ये होईल वाढ
असे म्हणतात की, महाशिवरात्री हा असा दिवस आहे, जेव्हा भगवान शंकर पृथ्वीवरील सर्व शिवलिंगात वास्तव्य करतात.
21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा (Maha Shivratri 2020) सण आहे. धार्मिक शास्त्रानुसार, तिन्ही जगाचा मालक, भगवान शिव यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून महाशिवरात्री ओळखला जातो. असे म्हणतात की, महाशिवरात्री हा असा दिवस आहे, जेव्हा भगवान शंकर पृथ्वीवरील सर्व शिवलिंगात वास्तव्य करतात. या दिवशी भक्ताने भगवान शिवला प्रसन्न केले, तर ते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
तुमच्याही आयुष्यात पैश्यासंबंधित समस्या असल्यास किंवा आरोग्याविषयी, दीर्घायुष्याबद्दल काळजी वाटत असेल, तर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपायांचा प्रयत्न करून शंकराचा आशीर्वाद प्राप्त करू शकता.
> शास्त्रामध्ये दिवस चार भागांमध्ये विभागला आहे. महाशिवरात्रीचा प्रत्येक प्रहर विशेष असतो. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची चार प्रहर पूजा करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळ आणि रात्री या चार प्रहारांनी रुद्राष्ट्यायी पाठ सोबत, दूध, गंगेचे पाणी, मध, दही किंवा तूप अशा वेगवेगळ्या अमृतांनी शिवला अभिषेक घालून, तुम्ही भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. जर तुम्हाला रुद्राष्टध्यायी पाठ करता येत नसेल, तर शिव षडयंत्र मंत्र 'ओम नमः शिवाय' चा जप करुनही तुम्ही शिवला अभिषेक करू शकता.
> ज्या लोकांना पैसे किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला स्पर्श करून हे रुद्राक्ष धारण करावे, त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. सहा मुखी रुद्राक्ष हे कुमार कार्तिकेचे रूप मानले जातात. रुद्राक्ष धारण केल्याने पैशावर आणि आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो.
> महाशिवरात्रीच्या दिवशी घरात स्फटिकाचे शिवलिंग स्थापित करा आणि नियमितपणे त्याची पूजा करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक प्रभाव दूर होईल. तसेच यामुळे पैशांचा आणि समस्यांचा अडथळा दूर होईल.
> भगवान शिवला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांपैकी सर्वात सोपा मंत्र म्हणजे, षडक्षरी मंत्र 'ओम नमः शिवाय'. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास आपल्याला मोठे पुण्य मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात बसून या मंत्राचा सव्वालाख जप केल्याने शिवाची कृपा सदैव तुमच्यावर राहील. (हेही वाचा: Maha Shivratri 2020: यंदा 21 फेब्रुवारी रोजी साजरी होईल महाशिवरात्री; जाणून घ्या मुहूर्त, पूजाविधी व उपवासाचे महत्व)
> महामृत्युंजय मंत्र, या मंत्राबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे की, या मंत्रामुळे मृत्याच्या दारी असलेल्या व्यक्तीला परत आणले जाऊ शकते. असुरांचे गुरू शुक्राचार्य यांनी या मंत्राच्या सामर्थ्याने अनेकदा देवासूर संग्रामात, देवतांच्या हातून मारलेल्या असुरांचे पुनरुत्थान केले होते. महा शिवरात्रीनिमित्त या मंत्राचा जप केल्यास रोग, शोक आणि अनेक प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता मिळते.
दरम्यान, माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते, यंदा 21 फेब्रुवारी रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी शिवाची आराधना, पूजा-अर्चना, उपवास करून महादेवाची प्रार्थना केली जाते. या दिवशी पिंडीला अभिषेक घालून, रात्रीच्या चार प्रहरी शिवाची विशेष पूजा केली जाते.