Maghi Ganesh Jayanti 2024 Date and Shubh Muhurt: यंदा 13 फेब्रुवारीला साजरी होणार माघी गणेश जयंती; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ

गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.

Maghi Ganesh Jayanti 2024 (file Image)

Maghi Ganesh Jayanti 2024 Date and Shubh Muhurt: गणपतीला बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2024) साजरी होते. यंदा मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जन्मोत्सव साजरा होणार आहे. माघी गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी.

महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या दिवशी गणपतीची षोडशोपचार गणेशपूजन करून त्याला तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो.

मुहूर्ताची वेळ-

या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 05 वाजून 44 मिनिटांपासून सुरु होणार असून मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल.

गणेश पूजा मुहूर्त- यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत असणार आहे.

पौराणिक कथेनुसार, गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता. त्यामुळे त्याच्या तीनही अवतारांची पूजा केली जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरी वेळ म्हणजे, माघ शुक्ल जयंती. (हेही वाचा: Ganapati Photos Free Download For Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंतीनिमित्त 'या' ठिकाणी मोफत डाउनलोड करा गणपतीचे काही खास फोटो)

दरम्यान, अग्नि पुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात.

Tags

ganapati festival Ganapati Photos Free Download Ganesh Chaturthi Ganesh Jayanti Ganesh Jayanti 2024 Ganesh Jayanti Auspicious Time ganpati images lord ganesh wishes in marathi Maghi Ganesh Chaturthi Maghi Ganesh Chaturthi 2024 Maghi Ganesh Jayanti Maghi Ganesh Jayanti 2024 Maghi Ganesh Jayanti 2024 Date Maghi Ganesh Jayanti 2024 Messages Maghi Ganesh Jayanti 2024 Shubh Muhurt Maghi Ganesh Jayanti Greetings Maghi Ganesh Jayanti HD Images Maghi Ganesh Jayanti Images Maghi Ganesh Jayanti Messages Maghi Ganesh Jayanti Quotes Maghi Ganesh Jayanti whatsapp-status Maghi Ganesh Jayanti Wishes Maghi Ganesh Jayanti Wishes in Marathi Maghi Ganesh Jayanti मराठी संदेश Maghi Ganesh Jayanti मेसेज Maghi Ganeshotsav Maghi Ganeshotsav 2024 गणपती फोटो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपतीचे फोटो मोफत डाउनलोड गणेश चतुर्थी गणेश जन्मोत्सव शुभेच्छा गणेश जयंती गणेश जयंती 2024 गणेश जयंती निमित्त शुभेच्छा गणेश जयंती शुभेच्छा माघी गणेश चतुर्थी माघी गणेश चतुर्थी 2024 माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती 2024 माघी गणेश जयंती 2024 तारीख माघी गणेश जयंती 2024 शुभ मुहूर्त माघी गणेश जयंती 2024 संदेश माघी गणेश जयंती WhatsApp स्टेटस माघी गणेश जयंती प्रतिमा माघी गणेश जयंती मराठी संदेश माघी गणेश जयंती मेसेज माघी गणेश जयंती शुभेच्छा माघी गणेश जयंती शुभेच्छा माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा माघी गणेशोत्सव माघी गणेशोत्सव 2024 सण आणि उत्सव