Lokmanya Tilak Jayanti 2020: लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.

Lokmanya Tilak (Photo Credits: FliCkr)

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात रत्नागिरीच्या चिखली गावामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी अनेकदा आपल्या भाषणातून, लेखणीमधून तर प्रसंगी आंदोलनामधून ब्रिटीश सरकार विरूद्ध आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राणांची आहुती देऊन भारत देशाला ब्रिटीशांच्या जाचातून आपली मुक्तता करणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांपैकी एक असलेल्या बाळ गंगाधर टिळक यांना आज 164 व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी. Lokmanya Tilak Jayanti 2020 Quotes: लोकमान्य टिळक यांचे विचार प्रेरणादायी विचार.

लोकमान्य टिळक यांच्याबद्दल खास गोष्टी

Lokmanya Tilak Jayanti 2020: लोकमान्य टिळक जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी - Watch Video 

पुण्यातील प्लेगच्या आजारामध्ये लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 दिवशी निधन झाले. टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.