Laxmi Pujan 2019 Messages: लक्ष्मी पूजनाच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, Greetings आणि शुभेच्छापत्रं!

तर यंदाच्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबरला दिवाळी पहाटसह लक्ष्मी पूजन सुद्धा करण्यात येणार आहे. दिवाळीदरम्यान लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व असून या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.

लक्ष्मी पूजन (Photo Credits-File Images)

दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहचला आहे. तर यंदाच्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबरला दिवाळी पहाटसह लक्ष्मी पूजन सुद्धा करण्यात येणार आहे. दिवाळीदरम्यान लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व असून या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम टिकून राहते असे मानले जाते. तर लक्ष्मीपूजनापासून व्यापारी लोकांचे नवे वर्ष सुरु होते. तसेच या दिवशी अभ्यंग स्नास केले जाते. एवढेच नाही तर सोन्याचे दागिने, चांदीचे रुपये आणि दागिन्यांची पूजा केली जाते. हा दिवस व्यापारी लोकांसाठी फार महत्वाचा असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेऊन तिला लक्ष्मी मानत त्याचे औक्षण करत पूजा केली जाते.

लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात.व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्व कुटुंब नवीन वस्त्र परिधान करतात. तसेच लक्ष्मीसह घरातील ज्येष्ठ सदस्यांचे आशिर्वाद घेऊन फटाके वाजवून आनंद साजरा करतात. तर लक्ष्मीपूजनाच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि जवळच्या मंडळींना ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images च्या माध्यमातून खास दिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरु नका.(Laxmi Pujan Diwali 2019 Date: यंदा दिवाळसणात लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या मुहूर्तावर करावे? जाणून घ्या पूजा विधी महत्त्व)

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करुन घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावल्या जातात. तसेच लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, यासाठी लोक लक्ष्मीमातेची मनोभावे पूजा करतात. अमावस्येला ‘लक्ष्मी’ (Laxmi) आणि ‘कुबेर’ (Kuber) या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्राहक असल्याचे म्हटले जाते. 'कुबेर' पैसा कसा राखावा, हे शिकवण देणारी देवता आहे.