Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2019 Live Streaming: 'लालबागचा राजा' विसर्जन मिरवणूकीचं थेट प्रक्षेपण एबीपी माझा, टीव्ही 9 मराठी, झी चोवीस तास वर लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

मंडपातून गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर पडली पडली असून 'गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या' च्या घोषात लालबाग, परळ भाग निनादत आहे.

Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2019 (Photo credits: Lalbaugcha Raja / You Tube)

Lalbaugcha Raja Visarjan 2019: लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक मंडळाच्या मंडपामध्ये बाप्पाची शेवटची आरती झाल्यानंतर आता बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्था झाला आहे. अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) पार्श्वभूमीवर आज मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सकाळी 10 नंतर लालबागच्या मंडपातून राजा बाहेर पडल्यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या या जयघोषात लालबाग, परळ भाग निनादला आहे. दरवर्षी सुमारे16-17 तासांच्या भव्य मिरवणूकीनंतर बाप्पाचं गिरगावच्या चौपाटीवर विसर्जन केलं जातं. त्याप्रमाणे यंदाही कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मुंबईकर गणेशभक्तांच्या गर्दीतून आता हळूहळू राजा पुढे सरकणार आहे. लालबागचा राजा विसर्जन सोहळा 2019 (Lalbaugcha Raja Visarjan Sohala) ची झलक लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाच्या युट्युब चॅनल प्रमाणेच आता टेलिव्हिजनवर गणेशभक्तांना पाहता येणार आहे. घरबसल्या बाप्पाचं दर्शन झी चोवीस तास, एबीपी माझा, टीव्ही 9 अशा न्यूज चॅनलवर पाहता येणार आहे. त्यामुळे गर्दी टाळून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला नक्की भेट द्या.

लालबागच्या राजाची ओळख ही नवसाला पावाणारा गणपती अशी आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र, देश, परदेशासह जगातील कानाकोपर्‍यातील लोकं हमखास तासन तास रांगेत उभे राहून घेतात. यंदादेखील भर पावसातही गणेशभक्तांनी लालबागचा राजा गणपती मंडळ भक्तांच्या गर्दीने फुलून गेलं होतं. यंदा चांद्रयान 2 च्या देखाव्यने लालबागचा राजा गणेश मंडळाचा मंडप सजला होता. गल्लीपासून मंडपापर्यंत या थीम वर आकर्षक सजावट करण्यात आली होती. Happy Anant Chaturdashi 2019 Images: अनंत चतुर्दशी निमित्त मराठी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या गणपती बाप्पाला निरोप!

लालबागचा राजा 2019 चं विसर्जन लाईव्ह पाहण्यासाठी  

एबीपी माझा

टीव्ही 9 मराठी

झी चोवीस तास

झी 24 तास वर लालबागचा राजा 2019 चं विसर्जन लाईव्ह पाहण्यासाठी  येथे क्लिक करा  

लालबाग ते गिरगाव चौपटी अशा मुंबईच्या रस्त्यांवर लालबागचा राजा पाहण्यासाठी चौकाचौकामध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. सकाळी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडल्यानंतर लालबाग, परळ, दोन टाकी, कुंभारवाडा असं करत उद्या पहाटे गिरगावच्या चौपाटीवर पोहचणार आहे. या काळात मुंबईमध्ये रहदारीच्या मार्गांमध्ये बदल केले आहे. काही रस्स्ते वाहतूकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या सार्‍यांचे भान ठेवत मुंबईकरांनी आज बाहेर पडावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईत आज रस्स्ते वाहतूक विस्कळीत असली तरीही रेल्वे वाहतूक चोख ठेवण्यात आली आहे. गणेश भक्तांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम मार्गावर आज रात्री विशेष मुंबई लोकलच्या फेर्‍या चालवण्यात येणार आहेत.