Lalbaugcha Raja 2019 First Look: लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक; चांद्रयान 2 च्या थीमवर आकर्षक सजावट

यंदा नितीन देसाई यांनी चांद्रयान 2 च्या थीमवर लालबागच्या राजाची आकर्षक सजावट केली आहे.

Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter)

Lalbaugcha Raja 2019 Pratham Darshan: मुंबईच्या लालबाग परिसरात मार्केटच्या चिंचोळ्या गल्लीमध्ये लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणपती विराजमान होत असला तरीही गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसांदरम्यान त्यांच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. सामान्य नागरिकांसोबतच क्रीडा, कला, राजकारण क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी हमखास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हमखास गर्दी करतात. यंदा लालबागचा राजा 86 वे वर्ष साजरे करत आहे. आज ( 30 ऑगस्ट) या मंडळाकडून लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना 2 सप्टेंबर 2019 पासून पुढील दहा दिवस मंडपामध्ये गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. यंदा नितीन देसाई यांनी चांद्रयान 2 (Chandrayaan 2) च्या थीमवर लालबागच्या राजाची आकर्षक सजावट केली आहे. 85 वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप

2 सप्टेंबरच्या पहाटे लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतरभक्तांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन खुले होणार आहे. यंदा 20 जुलै दिवशी लालबागच्या राजाचे पाद्यपूजन झाले. त्यानंतर लालबागच्या राजाच्या मूर्तीला साकरण्यात आले.

लालबागचा राजा 2019 प्रथम दर्शन

मुंबईमध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या धामधूमीमध्ये साजरा केला जातो. लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे त्याच्यापैकी एक आहे. दरवर्षी लाखो गणेशभक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदाही तितक्याच धामधूमीमध्ये हा सण साजरा केला जाणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राला पूराने झोडपून काढल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या सेलिब्रेशनला कात्री लावत पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. लालबागच्या सार्वजनिक गणपती मंडळाकडूनही गाव दत्तक घेऊन त्यांना सावरण्यासाठी मदत केली जाणार आहे.