Kumbh Mela 2019: नागा साधूंची कथा तुम्हाला माहिती आहे का? जाणुन घ्या येथे
यावेळी सर्व नागा साधु कुंभमेळ्यात मोठ्या भक्तीसंख्येने सहभागी होतात.
प्रयागराज येथे महाकुंभ 2019 या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सर्व नागा साधु कुंभमेळ्यात मोठ्या भक्तीसंख्येने सहभागी होतात.तर नागा साधूंना प्रथम स्नान करण्याची संधी दिली जाते. या साधूंमुळे कुंभमेळ्याचे आकर्षण द्विगुणीत होते.
तसेच नागा साधू यांचे आयुष्य हे साध्या साधुंपेक्षा खूप निराळे आणि खडतर असते. ही साधूमंडळी फक्त कुंभ मेळ्याच्याच वेळी भाविकांसमोर आलेले दिसून येतात.
-'या' साधूंनी केली सुरुवात
सनातन धर्माची रक्षा करण्यासाठी आणि त्यांचा पुढे जाण्यासाठी आदिगुरु शंकरराचार्य यांनी प्रथम नागा साधू बनण्याचे ठरविले. तसेच कुंभच्या आखाड्यामध्ये सध्या सन्यास्यांना नागा साधू बनण्याची परवानगी दिली जाते. याप्रमाणे एकूण 13 आखाडे आहेत जे नागा साधूंसाठी बनविले गेले आहेत.
- नागा साधू बनण्यासाठी लागतो 6 वर्षांचा कालावधी
नागा साधू बनण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. तसेच यासाठी तब्बल सहा वर्षानंतर नागा साधू बनता येते. तर नवीन सदस्याला फक्त लंगोटशिवाय कोणतेही वस्र परिधान करण्यास मनाई आहे. कुंभ मेळ्यात अंतिम शपथ घेतल्यानंतर नागा साधूमधील नवे सदस्य त्यांच्या लंगोटचे त्याग करु शकतात.
-ब्रम्हचर्याचे पालन करतात
नागा साधू बनण्यासाठी व्यक्तीची योग्य रितीने चौकशी केली जाते. तसेच या व्यक्तीला नंतर खूप काळासाठी ब्रम्हचारी रुप धारण करुन त्यांच्या गुरुंची सेवा करावी लागते.
- 5 गुरुंची आज्ञा पाळावी लागते
नागा साधू बनण्यासाठी कुंभमध्ये 108 वेळा डुबकी मारावी लागते. त्यानंतर त्यांचे 5 गुरु त्यांची नागा साधूसाठी निवड करतात. स्नान केल्यानंतर त्यांना केशरी रंगाचे वस्त्र, रुद्राक्षांची माळ आणि मेलेल्या माणसाची राख किंवा हवनमधील राख भस्म म्हणून देऊ करतात. त्यानंतर त्यांना अवधूत बनवण्याची तयारी करतात. (हेही वाचा-Kumbh Mela 2019: यंदा कुंभमेळा असेल कॅशलेस; दक्षिणा आणि शॉपिंगसाठी Paytm, स्वाईप मशीन्सची सोय)
-रात्रभर मंत्राचे जाप करतात
अवधूतचे जनेऊ संस्कार केले जातात आणि सन्यासी जीवनाची शपथ घेण्यास तयार होतात. तर अवधूत ते महाकुंभच्या दरम्यान त्यांना स्वत:चे आणि परिवाराचे पिंडदान करावे लागते. त्यानंतर रात्रभर ओम नम: शिवाय या मंत्राचा जाप करावा लागतो.
-अशा पद्धतीने नागा साधू बनतात
सकाळ होताच अवधूतांना अखाड्यात घेऊन जाऊन त्यांचे विजय हवन केले जाते. त्यानंतर गंगा नदीत 108 वेळा त्यांना डुबकी मारावी लागते. हे सर्व झाल्यानंतर त्यांना आखाड्यातील ध्वजाच्या खाली संस्कार प्रदान केल्यानंतर त्यांची नागा साधू बनण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
-या नियमांचे पालन करावे लागते
नागा साधूंना त्यांच्या आयुष्यात खूप नियमांचे पालन करावे लागते. नागा साधू फक्त दिवसातून एकवेळ जेवण करु शकतात. त्याचप्रमाणे सात घरे फिरुन भिक्षा मागावी लागते. जर भिक्षा न मिळाल्यास त्यांना उपाशी राहावे लागते. फक्त जमिनीवर झोपून नागा साधूंना त्यांचे संपूर्ण आयुष्य पार पाडायचे असते.