Vasu Baras Muhurat: वसुबारस सणाची तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि महत्व, जाणून घ्या
हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. गोवत्स द्वादशीच्या विशेष मुहूर्तावर गायीची पूजा करण्याची प्रथा आहे, गोवत्स द्वादशी दरवर्षी चंद्र महिन्याच्या अश्विनमधील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. गोवत्स द्वादशीची तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुया
Vasu Baras Muhurat: हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. गोवत्स द्वादशीच्या विशेष मुहूर्तावर गायीची पूजा करण्याची प्रथा आहे, गोवत्स द्वादशी दरवर्षी चंद्र महिन्याच्या अश्विनमधील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो. गोवत्स द्वादशीचा पवित्र सण भारतातील अन्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात गोवत्स द्वादशी हा सण वसुबारस म्हणून साजरा केला जातो. वसुबारसपासून दिवाळी सणाची सुरवात होते. गुजरातमध्ये गोवत्स द्वादशी हा सण वाघ बारस किंवा बच बारस म्हणून ओळखला जातो आणि आंध्र प्रदेशमध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांचा श्रीपाद वल्लभ आराधना उत्सव म्हणून ओळखला जातो. गोवत्स द्वादशीची तारीख, पूजा विधी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुया [ हे देखील वाचा: Govatsa Dwadashi 2022 Rangoli Designs: गोवत्स द्वादशीच्या शुभ प्रसंगी काढा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ ]
गोवत्स द्वादशी कधी आहे, जाणून घ्या
वसुबारस यंदा 21 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आहे.
गोवत्स द्वादशी 2022 पूजा तिथी
द्रिक पंचांग नुसार, प्रदोषकाल गोवत्स द्वादशी मुहूर्त 6:12 वाजता सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर, शुक्रवारी रात्री 8:40 वाजता समाप्त होईल. द्वादशी तिथी 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:22 वाजता सुरू होईल, 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:02 वाजता समाप्त होईल.
गोवत्स द्वादशी विधी आणि महत्त्व
ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये, गोवत्स द्वादशी हा सण दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो, गोवत्स द्वादशी हा सण धनत्रयोदशीच्या आधी साजरा केला जातो. वसुबारस ला नंदिनी व्रत असेही म्हणतात, कारण पवित्र मानल्या जाणाऱ्या नंदिनी आणि नंदीची पूजा केली जाते. वसुबारसला उपवास ठेवला जातो. वसुबारसला गहू आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळतात. कुटुंबातील महिला मुलांच्या कल्याणासाठी उपवास ठेवतात. नंदिनी व्रत दरम्यान, लोक गायींना दागिन्यांनी सजवतात आणि त्यांच्या कपाळावर सिंदूर लावतात. सत्त्वप्रधान असलेली गाय तिच्या दुधाने समाजाचे पालनपोषण करते आणि शेणाच्या खताने मातीची सुपीकता वाढवते. त्यामुळे वसुबारसनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते. अंकुरित मूग यांसारखे नैवेद्य भोग म्हणून अर्पण केले जातात.