Kartik Purnima 2022: उद्या आहे कार्तिक पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी
दुसरीकडे, कार्तिक पौर्णिमेला दान करण्याचा शुभ मुहूर्त 8 नोव्हेंबरला सूर्यास्तापर्यंत असेल.
Kartik Purnima 2022: कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. असे म्हणतात की, या महिन्यात भगवान विष्णूची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म करणाऱ्यांची सर्व पापे धुऊन जातात. कार्तिक पौर्णिमेचे (Kartik Purnima) व्रत जर भक्ताने मनापासून पाळले तर त्याला शंभर अश्वमेध यज्ञाचे फळ मिळू शकते, असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात कार्तिक महिना अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही कार्तिक पौर्णिमा उपवास ठेवण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. यात तुम्हाला कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घेता येईल...(हेही वाचा - Tripurari Pournima 2022: कार्तिक पौर्णिमेचे महत्व आणि धनप्राप्तीचे उपाय)
कार्तिक पौर्णिमा 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त -
हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाला साजरी केली जाते. पंचांगानुसार, कार्तिक पौर्णिमा 07 नोव्हेंबर रोजी 04:15 मिनिटांपासून सुरू होईल आणि 08 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 04:31 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात प्रत्येक काम सूर्योदयानुसार केले जाते. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचे व्रत 08 नोव्हेंबर 2022 रोजी ठेवण्यात येणार आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त नोव्हेंबरच्या संध्याकाळी 4.31 पर्यंत असतो. दुसरीकडे, कार्तिक पौर्णिमेला दान करण्याचा शुभ मुहूर्त 8 नोव्हेंबरला सूर्यास्तापर्यंत असेल.
कार्तिक पौर्णिमा महत्त्व -
हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूला हा महिना अतिशय प्रिय आहे असे म्हणतात. या महिन्यात भक्तांनी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार जन्मपत्रिकेतील दोषही या महिन्यात पूजा करून दूर केले जाऊ शकतात. कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जीवनात केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. एवढेच नाही तर कार्तिक पौर्णिमेचे व्रत केल्यास शंभर अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.