Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी यंदा कधी साजरी होणार? जाणून घ्या महत्त्व

आषाढी ते कार्तिकी एकादशी असा पाळला जाणारा चातुर्मास या एकादशीच्या दिवशी समाप्त होतो.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

विठू भक्तांसाठी आषाढी एकादशी इतकीच कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi) उत्सुकता असते. कार्तिकी एकादशी ही देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी हा दिवस कार्तिकी एकादशीचा असतो. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमाभागावरील प्रांतातही भाविक हा कार्तिकी एकादशीचा सण साजरा करतात. त्यानिमित्ताने विठठल-रूक्मिणीचे पंढरपूरात दर्शन घेतले जाते. कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi)म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे.

चातुर्मासाची सांगता देखील या देव उठनी एकादशी दिवशी होते. आषाढी ते कार्तिकी एकादशी असा पाळला जाणारा चातुर्मास या एकादशीच्या दिवशी समाप्त होतो. निद्रावस्थेमधून भगवान विष्णू जागे होतात आणि पुन्हा शुभ, मंगल कार्यांना सुरूवात केली जाते. नक्की वाचा: Katiki Ekadashi 2022: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात आजपासून विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिर 24 तास खुलं.

कार्तिकी एकादशी 2022 तिथी व तारीख

कार्तिकी एकादशी हा दिवस 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाईल. 3 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांपासून एकादशी तिथीला सुरूवात होत आहे तर कार्तिकी एकादशीच्या सांगता 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी होणार आहे. नक्की वाचा: Tulsi Vivah 2022 Dates: तुलसी विवाह यंदा कधी? इथे जाणून घ्या तारखा .

कार्तिकी एकादशी दिवशी अनेक भक्तागण दिवसभराचा उपवास ठेवतात. या दिवशी केवळ फलाहार घेऊन दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. काही मंडळी वारी करत, पालख्या घेऊन पंढरपूरात दाखल होतात. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं. ते जवळच्या विठ्ठल मंदिरात भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतात. एकादशीच्या नंतर तुळशीच्या लग्नाला देखील सुरूवात होते. कार्तिकी पौर्णिमेपर्यंत पुढे हा तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif