Kartiki Ekadashi 2020 Date: यंदा कार्तिकी एकादशी 25 की 26 नोव्हेंबर नेमकी कधी साजरी होणार?

वारकरी सांप्रदायात भागवत एकादशीला विशेष महत्त्व असल्याने कार्तिकी एकादशीचा पंढरपुरासह राज्यात सर्वत्र विठ्ठल- रूक्मिणी एकादशी मंदिरात कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला साजरी होणार आहे.

Vitthal Rukmini Representative Image (Photo Credits: Wikimedia Commons)

यंदा कोरोना संकटामध्ये राज्य सरकारच्या देऊळ बंदी नियमावलीनुसार वारकर्‍यांना आषाढी एकादशीला विठ्ठल रूक्मिणीचं (Vitthal Rukmini) दर्शन घेता आलेले नाही. परंतू आता दिवाळी पाडव्यापासून (Diwali Padwa) मर्यादित स्वरूपात देवळं भाविकांना खुली करण्यात आल्याने विठ्ठल-रूक्मिणीच्या भाविकांना कार्तिकी एकादशी 2020 (Kartiki Ekadashi) दिवशी पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेता येणार असल्याने वारकर्‍यांमध्ये यंदाच्या कार्तिकी एकादशीचे विशेष वेध लागले आहेत. कार्तिक शुक्ल एकादशीला साजरी केली जाणारी ही प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) यंदा 26 नोव्हेंबरला आहे. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनीला झोपी गेलेले भगावान विष्णू प्रबोधिनी म्हणजेच कार्तिक एकादशीला उठतात. म्हणूनच या एकादशीला देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) असे देखील संबोधले जाते. Pandharpur Vitthal Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी जाताना 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य

एकादशीत 'स्मार्त' आणि 'भागवत', असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी 'स्मार्त' व दुसर्‍या दिवशी 'भागवत', असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात 'स्मार्त' आणि 'भागवत', अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते. त्यामुळे यंदा 25 नोव्हेंबरला प्रबोधिनी स्मार्त एकादशी आहे. तर 26 नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे. वारकरी सांप्रदायात भागवत एकादशीला विशेष महत्त्व असल्याने कार्तिकी एकादशीचा पंढरपुरासह राज्यात सर्वत्र विठ्ठल- रूक्मिणी एकादशी मंदिरात कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. Tulsi Vivah 2020 Date and Shubh Muhurat: यंदा तुळशी विवाह कधी आणि कसा कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

शासकीय पूजेच्या मानानुसार विठ्ठल-रूक्मिणीच्या पंढरपुरातील देवळात पुजेचा मान कार्तिकी एकादशीला उपमुख्यांकडे असतो. यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्निक कार्तिकीला विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करतील.

सामान्य भाविक कार्तिक एकादशीला दिवसभर उपवास करतात. विठ्ठलाची, भगवान विष्णूची पूजा करतात. देहू- आळंदी मध्येही कार्तिकी एकादशीला मोठं उत्साहाचं वातावरण असतं. वारकरी कार्तिकी आणि आषाढीला हमखास वारी करत देवाचं मनोभावे दर्शन घेतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif