Kartik Purnima 2018: कार्तिक पौर्णिमा दिवशी गंगा स्नान करण्याचं महत्त्व काय? कशी कराल घरी पूजा ?

यादिवशी गंगा घाटावर दीपदान करण्याची प्रथा आहे. तसेच गंगेच्या पाण्यात डुबकी मारण्यासाठीदेखील भाविक गर्दी करतात.

कार्तिक पौर्णिमा दिवशी गंगा स्नान Photo Credit :Instagram

Kartik Purnima 2018:  कार्तिक पौणिमेच्या (Kartik Purnima) दिवशी दिव्यांची आरास करण्याची प्रथा आहे. प्रामुख्याने उत्तर भारतात त्रिपुरारी पूर्णिमा (Tripurari Purnima) म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी काशी - वाराणसी भागात भगवान शंकरांनी राक्षस त्रिपुरासुर याचा वध केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे काही भागात कार्तिक पूर्णिमा (Kartik Purnima) हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिक म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यादिवशी गंगा घाटावर दीपदान करण्याची प्रथा आहे. तसेच गंगेच्या पाण्यात डुबकी मारण्यासाठीदेखील भाविक गर्दी करतात. Kartik Purnima 2018 : कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळीचे महत्त्व काय ?

कार्तिक पूर्णिमेला गंगेत डुबकी मारण्याचं महत्त्व काय ?

देवउठनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवांसोबतच इतर देव मंडळीदेखील गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. स्वर्गातून देव या दिवशी गंगा तटावर येऊन दिवाळी साजरी करतात असादेखील समाज आहे. म्हणूनच देव दिवाळीचं औचित्य साधून गंगाघाटावर दिव्यांची आरास करून साऱ्या देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी भाविक गंगातटावर जमतात.

कार्तिकी पूर्णिमेला (Kartik Purnima) गंगा स्नान केल्याने पूर्ण वर्षभर गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळते. पाप कमी होते असा भाविकांचा समाज आहे. त्यामुळे गंगा स्नान किंवा देशभरातील पवित्र ठिकाणी पाण्यात डुबकी मारण्यासाठी भाविक गर्दी करतात.

गंगा स्नान करण्यासाठी जाऊ शकत नसल्यास काय कराल ?

प्रत्येकालाच कार्तिक पौर्णिमेदिवशी गंगा स्नान करणं शक्य नसते. अशावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्याचे काही पाणी मिसळून आंघोळ करावी. त्यानांतर विष्णूदेवाची आराधना करावी असा सांगितले जाते.

गंगास्नानप्रमाणेच देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी अन्नदान, गरजुंना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या कुवतीनुसार, अन्नदान, तांदूळ, ऋतूमानानुसार उपलब्ध फळ, उडीद दान करावे.