Kargil Vijay Diwas 2021 HD Images: कारगील विजय दिवसाच्या शुभेच्चा Quotes, Messages द्वारा शेअर करत वीर जवानांना करा सलाम
1999 च्या भारत-पाक युद्धानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी 26 जुलैचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती.
कारगील विजय दिवस (Kargil Vijay Diwas) हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या दिवसांपैकी एक आहे. भारत पाकिस्तान 1999 (Ind-Pak 1999 War) साली झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी दुर्गम भागात लढून पाकिस्तान सैन्याला हरवले होते या दिवसाच्या सन्मानार्थ आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्ह्णून साजरा केला जातो. मग आजचा कारगील विजय दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी आणि जवानांना सलाम करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटर वरून खास मेसेजेस,Wishes, Greetings शेअर करून हा दिवस साजरा करा. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज डाऊनलोड करून तुम्ही सहज शेअर करू शकता. नक्की वाचा: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं.
26 जुलै 1999 दिवशी भारतीय सेनेने कारगील युद्धादरम्यान चालवलेल्या 'ऑपरेशन विजय' ला यशस्वीरित्या पूर्ण केले होते. विजयाचा आनंद सोहळा साजरा करताना या दिवशी भारत-पाक युद्धामध्ये शहीद झालेल्यांप्रति देखील आदर व्यक्त केला जातो. त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
कारगील विजय दिवसाच्या शुभेच्छा
1999 साली सलग 74 दिवसांच्या युद्धानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानचला पाणी पाजले होते. या शौर्याचे प्रतीक म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 26 जुलैचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली होती. यंदा भारत 22 वा कारगील दिवस साजरा करत आहे.