जोतिबा चैत्र यात्रा 2019 मध्ये भाविकांचा रणरणत्या उन्हातही उत्साह कायम; पहा या यात्रेचे खास फोटो आणि व्हिडिओज
यंदा ही यात्रा 19 आणि 20 एप्रिल अशा दोन दिवशी आयोजित करण्यात आली आहे.
Jyotiba Mountain Chaitra Festival 2019: चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जोतिबा डोंगरावर दरवर्षी जोतिबाची यात्रा भरते. यंदा ही यात्रा 19 आणि 20 एप्रिल अशा दोन दिवशी आयोजित करण्यात आली आहे. काल (19 एप्रिल) हा या यात्रेचा पहिला आणि मह्त्त्वाचा दिवस होता. महराष्ट्र, कर्नाटक आणि सीमेलगतच्या अनेक गावातून भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी केली होती. गुलालाची उधळण, खोबऱ्याची पाखरण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी यांनी हा परिसर दुमदुमला होता. अनेक भाविकांनी या जोतिबा चैत्री यात्रा 2019 चे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत. दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रा 2019 प्रारंभ; असे असेल वाहतुकीचे नियोजन
जोतिबा चैत्री यात्रा 2019 फोटो
चैत्री पौर्णिमा यात्रा दिवशी राजदरबारी राजेशाही थाटामध्ये जोतिबाची बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.
जोतिबा चैत्री यात्रा 2019 व्हिडिओ
सासनकाठी हे चैत्र यात्रेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक होय. सुमारे 30 ते 40 फूट उंचीचे जाड निशाण, त्यावर तळामध्ये बसवलेले जोतिबाचे वाहन 'घोडा' असे सासनकाठीचे स्वरूप असते. यात्रेनिमित्ताने जोतिबा मंदिरात अनेक सासनकाठ्या वाजत-गाजत येतात त्यपैकी मानाच्या 95 सासनकाठींना डोंगर परिसरात मान मिळतो.