International Youth Day 2024 Quotes: आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त Facebook Messages, WhatsApp Status द्वारे तरुणाईला 'हे' प्रेरणादायी कोट्स पाठवून द्या खास शुभेच्छा!
जागतिक युवा दिन हा दिवस एक व्यासपीठ प्रदान करतो. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तुम्ही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रेरणादायी संदेश सोशल मीडियाद्वारे पाठवू शकता.
International Youth Day 2024 Quotes: दरवर्षी 12 ऑगस्ट ला आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) साजरा केला जातो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 17 डिसेंबर 1999 रोजी 12 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला. तरुण पिढीला प्रोत्साहान देण्यासाठी जगभरात युवा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतात देखील जागतिक युवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तरुण वर्ग हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. शाश्वत विकासासाठी आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांची महत्त्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीतील तरुणांचे योगदान साजरे करण्यासाठी जागतिक युवा दिन हा दिवस एक व्यासपीठ प्रदान करतो. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तुम्ही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रेरणादायी संदेश सोशल मीडियाद्वारे पाठवू शकता. (हेही वाचा - International Youth Day 2024 Date: आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी आहेInternational Youth Day 2024 Date: आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी आहे? इतिहास, महत्त्व आणि यावर्षी थीम काय? जाणून घ्या ? इतिहास, महत्त्व आणि यावर्षी थीम काय? जाणून घ्या)
- आंतरराष्ट्रीय युवा दिनासाठी शेअर करा 'हे' खास प्रेरणादायी कोट्स
तारुण्य हे उच्च उर्जा,
सकारात्मकता आणि आत्म्याचे प्रतीक आहे
तुम्हाला युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
- युवा दिनानिमित्त स्वत:ला एक जबाबदार
तरुण होण्याचे वचन द्या
देशाच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी
काम करा
युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
- आपल्या देशातील तरुणांची ऊर्जा आणि प्रतिभा अतुलनीय आहे
आपण सर्वांनी आपल्या प्रयत्नांनी देशाला नवीन उंचीवर नेण्याची आशा आहे
युवा दिनाच्या शुभेच्छा!!
- उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,
सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या,
लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
- नेतृत्व करताना सेवक बना, नि:स्वार्थी राहा
अनंत धैर्य बाळगा, शेवटी यश तुमचेच आहे
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
- प्रत्येक गोष्टीचा शेवट सुंदर असतो,
जर तो सुंदर नसेल तर तो अंत नसतो,
म्हणून जोपर्यंत सुंदर शेवट मिळत नाही,
तोपर्यंत मेहनत करत रहा, यश तुमची वाट पाहतंय…
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
- स्वतंत्र होण्याचे धाडस करा,
जिथपर्यंत तुमचे विचार जातात,
तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा,
विचारांना आयुष्यात उतरवण्याचे धाडस करा,
युवा दिनाच्या शुभेच्छा!
- तुम्ही जे काही विचार करता, तेच तुम्ही व्हाल,
स्वत:ला कमकुवत समजाल तर कमकुवत व्हाल
स्वत:ला बलवान समजाल तर बलवान व्हाल
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
- नेतृत्व करताना सेवक बना, नि:स्वार्थी राहा
अनंत धैर्य बाळगा, शेवटी यश तुमचेच आहे
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक विशिष्ट थीम साजरी करण्यात येते. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी युवक डिजिटल साधनांचा कसा उपयोग करू शकतात? हे अधोरेखित करणे हा यावर्षीच्या थीमचा उद्देश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

