International Yoga Day 2021 Wishes & HD Images: आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त हे WhatsApp Stickers, Happy Yoga Day Messages, Facebook, Greetings मित्र-परिवाराला पाठवून प्रोत्साहित करूयात
या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आपल्या खास आणि मित्र परिवारासह शेअर करूयात काही WhatsApp Stickers, Happy Yoga Day Messages, Facebook, Greetings आणि त्यांना ही योगा करण्यासाठी प्रोत्साहित करुयात.
International Yoga Day 2021 Wishes: आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून ला जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देशभरात लाखो लोक हा दिवस साजरा करतात. भारतात योगाभ्यास करण्याची परंपरा सुमारे 5000 वर्ष जुनी आहे. योग हे शरीर आणि आत्मा यांच्यात सामंजस्याचे आश्चर्यकारक विज्ञान मानले जाते. या प्राचीन प्रथेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. जरी योगाशी नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची आवश्यकता नसली तरीही या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन किंवा जागतिक योग दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. यानंतर, आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 पासून जगभरात साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करताना योगाच्या महत्त्वांवर चर्चा केली होती. (International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जाईल? काय आहे या वेळची थीम ? जाणून घ्या इतिहास )
या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आपल्या खास आणि मित्र परिवारासह शेअर करूयात काही WhatsApp Stickers, Happy Yoga Day Messages, Facebook, Greetings आणि त्यांना ही योगा करण्यासाठी प्रेरणा देऊयात.
कोरोनामुळे सध्या योग दिवस आपल्या घरातच साजरा करण्याची वेळ आली असली तरी, आपण घरातचं राहून काही सोपी योगासन करून हा दिवस साजरा करू शकतो.