International Men's Day 2019: महिलांनो ऐकलत का? पुरुषांच्या या 10 गोष्टी आहेत मजेशीर, खुद्द त्यांनाही नसतात माहित
हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ओस्टर यांच्याद्वारे पुरुष दिनाची सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाची कल्पना एक वर्ष आगोदर म्हणजेच 8 फेब्रुवारी 1991 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येऊ लागला.
Amazing Facts About Men: जगभरातील पुरुषांसाठी 19 नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा असतो. 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन (International Men's Day 2019) साजरा केला जातो. अर्थात, जगभरातील सर्वसामान्य अशा अनेक पुरुषांना याची कल्पनादेखील नसते. या दिवसाची कल्पना जशी पुरुषांना नसते तशीच त्यांच्या सहचारीणी असणाऱ्या महिलांना देखील नसते. जागतिक पुरुष दिनाचा इतिहास त्याची संकल्पना याबाबत प्रसारमाध्यमांतून अनेकदा लिहिले, बोलले जाते. पण, आज आम्ही इथे पुरुषांबद्दलच्या काही गोष्टी आपणास सांगणार आहो त्याबाबत आजवर प्रसारमाध्यमांमध्ये फरसे लिहिले, बोलले गेले नाही. म्हणूनच या काही धमाल गोष्टी आम्ही इथे देत आहोत. अर्थात, या गोष्टी विविध अभ्यासक, सर्व्हे, अहवाल यांची दखल घेत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आहेत.
- सांगितले जाते की, पुरुष आपल्या एकूण आयुष्यात 3 महिने म्हणजे तब्बल 90 दिवस हे केवळ रस्ताच विचारत असतात.
- काळे बटन अथवा रंग असलेली गॅझेट्स पुरुषांना अधिक अवडतात.आपल्या एकूण आयुष्यातील तब्बल एक वर्ष केवळ महिलांना पाहण्यात किंवा कटाक्ष टाकण्यात घालवतात.
- एका अहवालाच्या दाव्यानुसार महिलांच्या तुलनेत पुरुष प्रतिदिन अधिक खोटे बोलतात. महिला या प्रतिदिन सरासरी 3 वेळा खोटं बोलतात तर, पुरुष प्रतिदिन सरारसी 6 वेळा खोटं बोलतात.
- असंही सांगितले जाते की, पुरुष आपल्या एकूण आयुष्यात तब्बल 6 महिने केवळ दाढी करण्यात घालवतात.
- महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये (ज्येष्ठ) फॅट (चरबी) कमी प्रमाणात असते. तसेच, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मसल्सचे प्रमाण 50 टक्क्यांनी अधिक असते.
- पुरुषांना अनेक महिलांसोबत डेटींग करायला आवडते. पण, विवाह करण्यासाठी मात्र त्याला व्हर्जिन मुलगीच हवी असते.
- महिलांच्या तुलनेत परुषांच्या शरीरात अधिक उष्णता असते.
- महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक विसरभोळे असतात. जवळपास 85 टक्के पुरुष दिवसातून किमान 3 गोष्टी तर विसरत असतातच.
- पुरुष एका मिनिटांत तब्बल डाळ्याच्या पापण्या 11 वेळा हालवतात. तर, महिला 19 वेळा पापण्या हालवतात.
जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जगभरात 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ओस्टर यांच्याद्वारे पुरुष दिनाची सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाची कल्पना एक वर्ष आगोदर म्हणजेच 8 फेब्रुवारी 1991 मध्ये मांडण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येऊ लागला.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास आमचा दावा समजू नये. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही.)