Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार

त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. इंदिरा गांधी (Indira Gandhi Quotes) यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार.

Indira Gandhi | Representational Image (Photo Credits: Pixabay)

इंदिरा गांधी (Indira Gandhi), भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढून देश आणि जगभर चर्चेत असलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजी. ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांना 'आयर्न लेडी ऑफ इंडिया' (Iron Lady of India) म्हणूनही ओळखले जाते. अशा या व्यक्तीमत्वाची आज जयंती. इंदिरा गांधी यांची जयंती (Indira Gandhi Birth Anniversary) दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. इंदिरा गांधी (Indira Gandhi Quotes) यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार.

इंदिरा गांधी यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. त्याचा त्यांनी एकूण राजकीर्दीत चपकल वापर केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून काही चुकाही जरुर झाल्या. जसे की त्यांनी लागू केलेल्या आणिबाणीवर अनेकदा टीका होते. पण, पुढच्या काळात त्यांनी प्रचंड मुत्सद्दीगिरी दाखवली. ज्यामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. (हेही वाचा, Indira Gandhi Death Anniversary: विश्वासघाताने अशी घडली होती इंदिरा गांधींची हत्या; 80 बाटल्या रक्त चढवूनही नाही वाचले प्राण )

इंदिरा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार

इंदिरा गांधी या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. इंदिरा गांधी या भारताच्या दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वात लोकप्रीय आणि शक्तीशाली पंतप्रधान होत्या. त्यांनी पंतप्रधान म्हणून 1966 ते 1977 या काळात पहिली टर्म आणि 1981 ते 1984 पर्यंत दुसरी टर्म केली.