Indira Ekadashi 2019: पितृ पंधरवड्यात येणार्‍या 'इंदिरा एकादशी' ची तिथी व्रत वेळ आणि महत्त्व

तसेच पितरांचा आशिर्वाददेखील त्यांच्यावर कायम राहतो. तसेच काही श्रद्धाळू असे देखील मानतात.

इंदिरा एकादशी व्रत 2019, (Photo Credits: Facebook)

Indira Ekadashi Date and Time: आज (25 सप्टेंबर) दिवशी देशभरात हिंदू धर्मीय इंदिरा एकादशी (Indira Ekadashi) साजरी करत आहेत. भाद्रपद महिन्यातील पितृ पंधरवड्यात येणारी इंदिरा एकदाशी ही अनेक कारणांमुळे खास आहे. धार्मिक दृष्ट्या पाहता या दिवशी भगावान विष्णू यांचे एक रूप समजले जानार्‍या 'शाळीग्राम'ची पूजा -अर्चना केली जाते. हिंदू धर्मीयांची अशी आस्था आहे की जर पितृ पंधरवड्यात येणार्‍या इंदिरा एकादशी दिवशी पूर्ण भक्ती-भावाने उपासना केल्यास त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच पितरांचा आशिर्वाददेखील त्यांच्यावर कायम राहतो. तसेच काही श्रद्धाळू असे देखील मानतात की जर कोणी पितर नरकामध्ये यातना भोगत असेल तर त्याला आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी 'इंदिरा एकदशी'चं व्रत फलदायी आहे. या व्रतामुळे यम देव त्यांना मुक्ती देतो. त्यामुळे जाणून घ्या आजच्या इंदिरा एकादशी व्रताची शुभ वेळ, धार्मिक मह्त्त्व. Pitru Paksha 2019 Dates: पितृपंधरवडा 2019 मध्ये पहा कोणत्या तिथीचं श्राद्ध कधी असेल?

इंदिरा एकादशी तारीख, वेळ

इंदिरा एकादशी तारीख - 25 सप्टेंबर 2019

इंदिरा एकादशी तारीख तिथी वेळ - एकादशीची सुरूवात 24 सप्टेंबर दिवशी दुपारी 16.44 ला झाली असून समाप्ती आज दुपारी 14:09 वाजता होईल.

इंदिरा एकादशी धार्मिक महत्त्व

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, पितृ पंधरवड्यामध्ये पितरांच्या मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी मह्त्त्वाचे आहे. तसेच हे व्रत करनार्‍या व्यक्तीलादेखील मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो. यासोबतच आजच्या इंदिरा एकादशी दिवशी व्रत करणार्‍या व्यक्तीने विष्णूसहस्त्र नामावलीचं पठण करावे. यामुळे आयुष्यभर तुमच्यावर भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो असा देखील समज आहे.

इंदिरा एकादशी दिवशी शाळीग्रामची पूजा केली जाते. सोबतच एकादशीचा उपवास ठेवत अनेकजण आजच्या दिवशी ब्राम्हणाला अन्न दान करतात.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)